Hoot Balloon
Hoot Balloon 
टूरिझम

भारतातील या शहरांमध्ये आहे हाॅट बलून राईड..

भूषण श्रीखंडे

जळगावः कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पर्यटनस्थळे (Tourist places) देखील अनेक ठिकाणी खुली झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर बलून राईडचा (Hoot Balloon ride) आनंद नक्की घ्या. चला जाणून घेवू कोठे आहेत बलून राईड..

सोहना

देशाची राजधानी दिल्ली जवळील हरियाणा राज्यातील सोहना शहर अंतर फक्त 51 किलोमीटर आहे. सोहना हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. सोहना वीकेंड हॉलिडे साजरा करण्यासाठी देखील प्रसिध्द आहे. येथे मोठ्या संख्येने लोक विकेंडला येत असतात. तुम्ही सोहनामध्ये बलून राईडचाही आनंद घेऊ शकता.

जयपूर

राजस्थान राज्याची ओळख तेथील संस्कृती आणि सभ्यतेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे परदेशातून येणारे पर्यटक राजस्थानमधून आपला प्रवास सुरू करतात. त्यात या राज्यातील जयपूर हे शहर पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे केंद्र असून येथील बलून राईड देखील प्रसिध्द आहे. जयपूर आणि पुष्करमध्ये बलून राईडची व्यवस्था असून सुमारे 4 हजार फूट उंचीवर बलून राईडचा आनंद तुम्ही घेवू शकतात. 60 मिनिटांसाठी आकाशाचा फेरफटका मारू शकता. आपण गुलाबी शहर देखील पाहू शकता.

आग्रा

दिल्ली राजधानीच्या शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथे बलून राईडची सुविधा आहे. येथे तुम्ही केवळ बलून राईडचा आनंद घेऊ शकत नाही, तर तुम्ही प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल देखील पाहू शकता. येथे सकाळ आणि संध्याकाळ बलून राईड करण्याचा योग्य वेळ मानली जाते. आग्राला रस्ता आणि रेल्वे मार्गाने तुम्ही पोहोचू शकतात. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यात आग्रा बलून राईड फेस्टिव्हल आयोजित केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT