Sky Cycling
Sky Cycling 
टूरिझम

स्काय सायकलिंग म्हणजे काय, भारतात हे एडवेंचर तुम्ही कुठे करू शकता?

रोहित कणसे

देशात सध्याच्या घडीला सायकल ही पहिल्यासारखी दैनंदिन वापरासाठी सर्वसामान्यांची गरज राहिली नाही. लोकांकडे सायकल आता अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु बरेच लोक अजूनही हौस म्हणून सायकल वापरतात. गरजू आणि हौशी लोक वगळता काही लोक आरोग्यासाठी सायकल चालवितात. शिवाय आणखी एक वर्ग सायकल वापरताना दिसतो जो क्रीडा आणि एडवेंचरशी निगडित आहे. अशा लोकांची संख्या बोटावर मोजण्यासारखी आहे. परंतु एडवेंचर म्हणून पर्यटन करणाऱ्यांचा मोठा वर्ग आहे. हे लक्षात घेऊनच 'स्काय सायकलिंग' सुरु झाले आहे. भारतात दोन दशकांपूर्वी सामान्य जनजीवनात सायकल हे प्रमुख वाहन होते. जशी माणसाची प्रगती होत गेली तशी प्रवासाची नवीन साधने उपलब्ध झाली. त्यामुळे सायकल प्रवास हा मागे पडत गेला. परंतु काही हौशी लोकांमुळे अजून सायकल अस्तित्व  टिकून आहे. हौशी लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कि भारतात  'स्काय सायकलिंग' सुरु झाले आहे.  

'स्काय सायकलिंग' म्हणजे काय?

रोड सायकलिंग व्यतिरिक्त ट्रॅक सायकलिंग, बीएमएक्स, एमटीबी यासारखे प्रकार तरूणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत, पण स्काय सायकलिंग भारतात अजून लोकप्रियता मिळवू शकलेली नाही. असे असले तरीही भारतात 'स्काय सायकलिंग'ला एडवेंचर म्हणून प्रमोट करण्यास सुरवात झाली आहे. 

तर मग आपण आकाशात सायकल कशी चालवू शकतो ? असा प्रश्न तुम्हाला पडला असले. परंतु  गुरुत्वाकर्षणाला नाकारणारा किंवा त्याला विरोध करणारा असा कुठलाही शोध लावण्यात आलेला नाही. जमिनीपासून काही उंचीवर सायकल चालवण्यासाठी व्यवस्था बनवण्यात आली आहे. उदा. जसे की आपण रोप वेचा आनंद एका ट्रॉलीमध्ये बसून घेतो . त्याप्रमाणेच 'स्काय सायकलिंग'साठी रस्सीचा ट्रॅक बांधला जातो जो की सस्पेंशनयुक्त असतो. या ट्रॅकच्या दोरीवर सायकल चालविण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षकाकडून तुम्हाला योग्य त्या खबदारीच्या सूचना दिल्या जातात. त्यानंतर हेल्मेट आणि संरक्षक गियर घालून या दोरीच्या ट्रॅकवर सायकल चालवण्यास परवानगी देण्यात येते. या एडवेंचरचा आनंद असेच लोक घेऊ शकतात की ज्यांना उंच गेल्यावर भीती वाटत नाही किंवा ज्यांना ह्र्दयासंदर्भात कुठलेही आजार नाहीत. जर आपण 'एक्रोफोबिया'सारख्या आजाराने ग्रस्त असाल किंवा आपल्याला एडवेंचरमध्ये रस नसेल तर आपण स्काय सायकलिंगपासून दूर रहावे. स्काय सायकलिंग भारतापूर्वी काही देशांमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. नेपाळमधील पोखरासह काही ठिकाणी हे एडवेंचर पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

भारतात 'स्काय सायकलिंग' कोठे आहे?

देशात आपण सध्या तीन ठिकाणी एडवेंचरचा आनंद  घेऊ शकता. यामध्ये कुल्लू मनाली, ऋषिकेश आणि कोची या ठिकाणांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२० मध्ये देशातील पहिले 'स्काय सायकलिंग' पार्क हे मनालीमध्ये गुलाबा या भागात सुरु करण्यात आले आहे. 'स्काय सायकलिंग'साठी बनवण्यात आलेला ट्रॅक समुद्र सपाटीपासून 9000 फूट उंचीवर आहे. येथे  एडवेंचर पर्यटकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने याची सुरुवात केली गेली आहे.

देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या कुल्लू मनालीमध्ये सोलंग व्हॅलीमध्ये पॅराग्लाइडिंग आणि स्कीइंगसारखे साहसी खेळ पूर्वीपासूनच सुरू आहेत. रोहतांग पास मनालीतील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे हिमच्छादित भागामध्ये माउंटेन बाइकिंग आणि स्कीइंग खूप लोकप्रिय आहे. भविष्यात स्काय सायकलिंग एडवेंचर प्रेमींसाठी एक नवीन आणि आकर्षक पर्याय बनू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT