Ram Mandir
Ram Mandir esakal
टूरिझम

Ram Mandir : देशातील 'या' शहरांमध्ये आहेत प्रभू श्रीरामाची प्रसिद्ध मंदिरे, एकदा नक्की भेट द्या

Monika Lonkar –Kumbhar

Ram Mandir : सध्या संपूर्ण देश रामभक्तीमध्ये दंग झाला आहे. २२ जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. त्यामुळे, अयोध्येमध्ये सध्या वेगळाच उत्साह पहायला मिळत आहे.

प्रभू श्रीरामांच्या या प्रतिष्ठापणा सोहळ्याला राजकारणापासून ते क्रीडा, मनोरंजन आणि अध्यात्म इत्यादी क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. या व्यतिरिक्त विविध देशांमधील १०० विशेष लोकांनाही या सोहळ्याची खास आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

परंतु, या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी सर्वांनाच अयोध्येत जाणे शक्य नाही. आपल्या देशातील प्रभू श्रीरामांच्या प्रसिद्ध मंदिरांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला देशभरातील सुप्रसिद्ध राम मंदिरांबद्दल सांगणार आहोत. या राम मंदिरांना तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.

रामास्वामी मंदिर (तामिळनाडू)

दक्षिण भारत हा तेथील निसर्गासाठी, खाद्यसंस्कृतीसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतातील मंदिरांना भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करतात.

तामिळनाडूमध्ये स्थित असलेले रामास्वामी मंदिर हे प्रभू श्रीरामांचे एक जगप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर प्रभू श्रीरामांना समर्पित असून या मंदिराचा रामायणातही उल्लेख असल्याचे सांगितले जाते. या मंदिरात प्रभू श्रीरामांसोबत लक्ष्मण, सीता आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तीही स्थापित आहेत.

राम राजा मंदिर (मध्यप्रदेश)

अयोध्याच्या व्यतिरिक्त उत्तर भारतामध्ये प्रभू श्रीरामांचे हे आणखी एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर त्याच्या धार्मिक महत्वासाठी ओळखले जाते. मध्य प्रदेशातील ओरछामध्ये स्थित असलेले हे मंदिर देशातील असे एकमेव मंदिर आहे. जिथे प्रभू श्रीरामांची देव म्हणू नव्हे तर राजा म्हणून पूजा केली जाते.

काळाराम मंदिर (महाराष्ट्र)

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये स्थित असलेले काळाराम मंदिर हे प्रभू श्रीरामांचे प्रसिद्ध मंदिर आहे. मागील काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराला भेट दिली होती. देशातील महत्वाच्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश आहे.

या मंदिराचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास हे देशातील असे एकमेव मंदिर आहे. जिथे काळ्या पाषाणातील रामाची मूर्ती विराजमान आहे. प्रभू श्रीरामांची ही विलोभनीय मूर्ती गोदावरी नदीमध्ये सापडल्याचे सांगितले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde : ओबीसी मेळाव्यांना अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी; धनंजय मुंडेही सोबतीला...

Latest Marathi Live Updates : पुढील ३ तासांत 'या' जिलह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

'PM Kisan'च्या 17व्या हप्त्याची घोषणा; जाणून घ्या, कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : पोर्तुगालचा 39 वर्षाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो युरो कपनंतर घेणार निवृत्ती?

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

SCROLL FOR NEXT