Anand Mahindra shares video of Laurel and Hardy dancing to Natu Natu song from RRR video goes viral  
Trending News

Anand Mahindra: 'लॉरेल अँड हार्डी'चा 'नाटू-नाटू'वर बुंगाट डान्स! महिंद्रांनी शेअर केला Video

सकाळ डिजिटल टीम

महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर खूपच अँक्टिव्ह असतात. ट्विटरवर ते नेहमीच वेगवेगेळे व्हिडीओ-फोटो शेअर करत राहतात.

आता त्यांनी फेमस कॉमेडी जोडी लॉरेल आणि हार्डी हे दोखे RRR चित्रपटामधील नाटू-नाटू (Naatu-Naatu) या गाण्यावर नाचत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

नाटू-नाटू गाण्याची भूरळ जगभरातील चागत्यांना पडलेली आहे. यात आता भूतकाळातील प्रसिद्ध विनोदी जोडी लॉरेल अँड हार्डी यांची देखील भर पडली आहे.

नव्वदीच्या काळात अनेकांचे बालपण सुखद करणाऱ्या या जोडीच्या डान्स व्हिडीओवतक नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

यातच आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, "#NaatuNaatu च्या मोहापासून कोणीही सुरक्षित नाही. अगदी भूतकाळातील लोक देखील नाहीत..L&H मध्ये RRR जोडीसारखी उर्जा असू शकत नाही, परंतु ते वाईटही नाहीत! आनंद घ्या #Fridayfeeling."

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपतील नाटू-नाटू गाण्याने नुकतेच 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ऑरिजनल सॉंग कॅटेगरीत पुरस्कार जिंकला.

या गाण्याने इंटरनॅशनल स्टेजवर देखील या गाण्याने भारताचे नाव उंचावले आहे. या गाण्याची चर्चा जगभरात होत आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर जगभरातून याच्या निर्मात्यांचं कौतुक देखील होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT