Viral Video
Viral Video sakal
Trending News

CCTV Footage : चहा पिण्यासाठी पोलिस थांबले अन् गाडीतून पळाले कैदी; घटना कॅमेऱ्यात कैद

सकाळ डिजिटल टीम

झाशी : चहा पिण्यासाठी पोलिस थांबले आणि गाडीतून थेट तीन कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. उत्तरप्रदेशमधील झाशी कोर्ट परिसरात ही घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी हा प्रकार घडला. ११ पोलिस अधिकारी सात कैद्यांना झाशी येथील रेल्वे कोर्ट येथून घेऊन जात होते. पोलिस अधिकारी वाटेत एका ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेले असताना सात पैकी तीन आरोपी व्हॅनमधून उतरून पळून गेले. ही घटना घडल्यानंतर पोलिस त्यांच्या शोधासाठी मागे धावले पण अजूनपर्यंत या कैद्यांचा शोध लागला नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ पोलिस अधिकारी यांच्या शोधार्थ पाठवण्यात आले आहेत. लवकरच हे आरोपी आमच्या ताब्यात असतील असा विश्वास पोलिसांनी दाखवला असून अधिकचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे.

तर ही घटना घडल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली असून संताप व्यक्त केला जात आहे. महिलांची छेड काढणाऱ्या किंवा अत्याचार करणाऱ्यांना यमसदनी पाठवलं जाईल असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ नेटकऱ्यांकडून शेअर केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT