Bhabhi Dance Viral Video : हल्ली कोणतंही फॅमिली फंक्शन डान्स झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि मग अशाच कार्यक्रमातला एखादा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओची खासियत म्हणजे एक भाभी यात आपल्या नवऱ्याची तक्रार करत नाचत आहे. घरातल्या सर्व पाहुणे मंळणीसमोर तिचा हा डांस सर्वांच्याच चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल आणत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातल्या एका कौटुंबिक सोहळ्यातला आहे.
या डांसने सगळ्यांचेच मन जिंकलं आहे. 'मेरे स्वीटू, मेरे शोना, मेरे मजनू, मेरे हसबैंड मुझे प्यार नही करते...' या गाण्यावर केलेल्या भाभीच्या डांसला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे.
भाभीचा हा डांस व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेयर केला जात आहे. त्याला नेटकरीपण प्रतिक्रीया देत आहेत. एका युझरने लिहीलं फॅमिली फंक्शनमध्ये अशाप्रकारचा डांस पहिल्यांदाच बघितला. तर दुसऱ्याने लिहिलं या भाभीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.