Video Sakal
Trending News

Viral Video : चालू विमानातंच प्रवाशी एकमेकांना भिडले; एकाला धू धू धुतलं

सकाळ डिजिटल टीम

आपण कधी विमानाने प्रवास केलाय? केला असेल तर त्यामध्ये प्रवाशांनी भांडणं केल्याचं पाहिलंय? एसटी बसमध्ये बसण्याच्या जागेवरून अनेक वेळा प्रवाशांचे भांडणं झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल. विमानात प्रवासी सहसा भांडणे करताना आढळत नाहीत. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा बँकॉक ते दिल्ली दरम्यानच्या फ्लाईटमधील असल्यांच समोर आलं आहे. सौरभ सिन्हा यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोन प्रवाशांची बाचाबाची चालली असल्याचं सुरूवातील दिसतंय तर त्यानंतर या भांडणाचं रूपांतर हाणामारीत होताना दिसत आहे.

तर एका प्रवाशाला दोन तीनजण मिळून मारताना दिसत आहेत. त्यांच्या या भांडणात एअर होस्टेसची पळापळ होताना दिसत आहे. ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण प्रवासी तिचे ऐकत नाहीत.

दरम्यान, सिन्हा यांनी ट्वीट करत सांगितलं की, भारत ते थायलंड दरम्यानच्या फ्लाईटमध्ये अशा घटना घडत असतात अशी प्रतिक्रिया एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी मित्रांनी सांगितलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला असून त्यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

Western Railway: तिकीट काउंटरवरील लांबच लांब रांगा टळणार, मुंबई रेल्वेची नवी सुविधा, आता लोकलही राबवणार 'एसटी पॅटर्न'

PAK vs SA: बाबर आझमला फॉर्म सापडेना! टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून कॅच घेत धाडलं माघारी, पाहा Video

Lakshmi Pujan 2025 Story: आपण लक्ष्मीपूजन का करतो? ही आहे त्यामागची आख्यायिका; शुभ मुहूर्तही जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ आमने-सामने

SCROLL FOR NEXT