Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : तिरंगा ध्वजाचा अपमान; टरबूज साफ करण्यासाठी केला वापर

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाने आपल्या तिरंगा ध्वजाचा मान राखला पाहिजे असं आपण शाळेतच शिकलो आहोत. तर अनेक जणांकडून तिरंग्याचा अपमान केला गेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिरंग्याचा अपमान करणे हा कायदेशीर गुन्हा असून सुद्धा काही लोकं हा गुन्हा करत असतात.

सध्या एका तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तो हातात तिरंगा ध्वज घेऊन टरबूज साफ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ राजस्थानातील जयपूर येथील असल्याची माहिती व्हिडिओत देण्यात आली आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, या तरूणाला शिक्षा करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. वादग्रस्त कमेंट काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. ट्वीटरवरील पुजा सिंग या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT