Trending News Sakal
Trending News

Viral News: ऑनलाईन ऑर्डर केली अन् चार वर्षांनी पोचलं पार्सल; दिल्लीतल्या माणसाचा भन्नाट अनुभव ऐकला का?

या व्यक्तीचं ट्वीट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

वैष्णवी कारंजकर

आजच्या डिजिटल युगामध्ये घरबसल्याच लोक ऑनलाईन शॉपिंग करत आहेत. अगदी रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या गोष्टीही लोक दुकानात जाऊन आणण्यापेक्षा ऑनलाईन ऑर्डर करतात. यामुळे जास्त कष्ट पडत नाही आणि बाहेरही जावं लागत नाही. काही लोक सामान ऑर्डर केल्यानंतर ऑर्डर ट्रॅकही करत असतात.

हे सामान मागवण्याचा उत्साह एखाद्यामध्ये इतका असतो, की ते सतत ऑर्डर ट्रॅक करतात आणि सतत सामान घरी लवकर येण्याची वाट पाहत असतात.  आणि जर ऑर्डर यायला काही कारणामुळे उशीर झाला तर ते अस्वस्थही होतात.  पण तुम्ही विचार करा, जर आपली ऑर्डर चार वर्षांनी मिळाली तर? दिल्लीतल्या एका माणसासोबत असं खरंच घडलं आहे.

दिल्लीतल्या नितीन अग्रवालने याबद्दलचा आपला अनुभव शेअर केला आहे. तो म्हणतो, “कधीही आशा सोडू नका. जेव्हा मी २०१९ मध्ये अली एक्सप्रेस या साईटवरुन ऑर्डर केली होती. ती ऑर्डर आज डिलीव्हर झाली आहे.” याबद्दल त्याने एक ट्विट केलं आहे आणि या पॅकेजचा फोटोही शेअर केला आहे. या पॅकेजवरची तारीख आहे मे २०१९. ज्या ऍपवरुन ही ऑर्डर मागवली होती, ते चिनी ऍप आता बॅन करण्यात आलं आहे.

अली एक्सप्रेस हे चिनी ऍप आहे. ज्या वेळी टीकटॉकसारखे अनेक चिनी ऍपवर बंदी घालण्यात आली, त्यावेळी २०२० मध्ये सुरक्षेच्या कारणावरुन अली एक्सप्रेसही बंद करण्यात आलं होतं. हे ट्विट कमी वेळातच व्हायरल झालं आहे. युजर्सने या ट्विटखाली आपले अनुभव शेअर करण्यास सुरुवात केली आहे. एक युजर म्हणतो की मी एवढा लकी असायला हवा होतो.

तर आणखी एका युजरने आपला डिलीव्हरीचा अनुभव शेअर केला आहे. मलाही अली एक्सप्रेसवरुन ८ महिन्यांच्या नंतर माझं पार्सल मिळालं. तोपर्यंत मला अलीएक्सप्रेसने पैसेही परत केले होते. एका युजरने याहूनही भन्नाट अनुभव सांगितला आहे. तो म्हणतो की, मी काही वर्षांपूर्वी आपल्याच देशातल्या एका ऑनलाईन स्टोरमधून काहीतरी ऑर्डर केलं होतं. पण ती ऑर्डर मला जवळपास साडे सहा वर्षांनी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : साई चरणी २० लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; साईभक्ताचा संस्थानकडून सन्मान

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT