Book Review_Police Janata PrasarMadhyam 
Trending News

Marathi Book Review: 'पोलीस, जनता व प्रसारमाध्यमे'

Book Review : आपण एका लोकशाही राष्ट्रात राहतो जिथं जनता ही केंद्रस्थानी असून तिच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन तर प्रश्न मांडण्यासाठी प्रसारमाध्यमं असतात.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुस्तक परिचय

'पोलीस, जनता व प्रसारमाध्यमे'

लेखक - डॉ. बी. आर. कत्तुरवार, डॉ. जी. एम. सूर्यवंशी

प्रकाशक - स्वयंदीप प्रकाशन, पुणे

किंमत - २०० रुपये

Marathi Book Review : आपण एका लोकशाही राष्ट्रात राहतो जिथं जनता ही केंद्रस्थानी असून तिच्या मदतीसाठी पोलीस प्रशासन तर तिचे प्रश्न मांडण्यासाठी प्रसारमाध्यमं असतात. पोलीस आणि प्रसारमाध्यमे ही लोकशाही व्यवस्था आणि कायद्याच्या राज्याचा हा कणा आहेत. यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.

कारण जनता, सरकार तसेच प्रशासन यांच्यामध्ये दुवा म्हणून ते काम करतात. पण बऱ्याचदा यांच्या एकमेकांप्रती असलेल्या भूमिकेचा ताळमेळ बसवताना अनेक आव्हान उभी राहतात. पण सरतेशेवटी ही व्यवस्था अविरत कार्यरत ठेवण्यासाठी यांच्यामध्ये समन्वय राखणं गरजेचं असतं त्याच अनुषंगानं जनता, पोलीस आणि प्रसारमाध्यमं यांच्यातील परस्पर संबंध कसे असावेत? यावर अभ्यासपूर्ण विवेचन एका पुस्तकातून करण्यात आलं आहे. प्रा. डॉ. बी. आर. कत्तुरवार आणि डॉ. जी. एम. सूर्यवंशी यांनी लिहिलेलं 'पोलीस, जनता व प्रसारमाध्यमे' हे पुस्तक आपल्याला व्यवस्थेविषयी अधिक प्रगल्भ व्हायला मदत करतं.

एखाद्या लोकशाही राष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे? हे तिथली जनता, पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांच्यातील संबंध कसे आहेत? यावर ठरतं. कारण जर हे संबंध कायमच बिघडलेले किंवा तणावाचे असतील तर त्या राष्ट्रात भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतो, गुन्हेगारी-अन्याय-अत्याचार वाढलेले दिसतात. एकूणच तिथं आपल्याला अनागोंदी पहायला मिळते. पण जिथं हे संबंध परस्पर समन्वयाचे, नियंत्रणाचे आणि चर्चेचे असतात तिथली व्यवस्था ही लोककल्याणकारी अन् लोकाभिमुख असते. (Latest Marathi News)

तरीही या दोन्ही गोष्टी स्वतंत्रपणे तंतोतंत पहायला मिळत नाहीत तर दोन्हींचं मिश्रणच पहायला मिळतं. भारतातही सर्वकाही आलबेल आहे असं आपण म्हणून शकत नाही, पण भारतासारख्या अत्यंत विरोधाभास असणाऱ्या समाजव्यवस्थेत आणि संस्कृती-वारशांमध्ये इथली लोकशाही टिकून राहिली. किंबहुना ती बळकट झाली तीच मुळी जनता, पोलीस आणि प्रसारमाध्यमं यांच्यातील समन्वयामुळं.

हे पुस्तक म्हणजे 'पीएचडी'साठी केलेला एक संशोधनपर प्रबंधच आहे. यासाठी वापरलेलं सॅम्पल हे नांदेड जिल्हा आहे. या जिल्ह्यातील जनता, पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमं यांच्यातील संबंधांचा प्रशासकीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी विशिष्ट प्रश्नावली देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये मुलाखत, निरीक्षण आणि प्रत्यक्ष संवाद असा पॅटर्न ठेवण्यात आला. यासाठी लेखकांनी विविध प्रकारचे शेकडो संदर्भ तपासले आहेत. पुस्तकात प्रत्येक प्रकरणानंतर त्यासाठी वापरलेल्या संदर्भांची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भांसाठी विविध पुस्तकं, शोध प्रबंध, जरनल्स आणि वेबसाईट्सचा यांचा वापर करण्यात आला आहे.

'पोलीस, जनता व प्रसारमाध्यमे' या पुस्तकात एकूण ७ प्रकरणं असून यातील प्रत्येक प्रकरणात पोलीस प्रशासनाचं कार्य, रचना त्यांचे जनतेशी आणि प्रसारमाध्यमांशी असलेले संबंध यांचा विविध प्रकारे उहापोह करण्यात आला आहे. प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यातच हे पुस्तकरुपी संशोधन झाल्यानं या जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेवर एक सविस्तर प्रकरण यामध्ये आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांसाठी दोन प्रकरण आहेत, त्यात पोलीस आणि प्रसारमाध्यमांतील संबंध तर जनता व प्रसारमाध्यामांतील संबंधात पोलीस प्रशासनाची समस्या या विषयांचा समावेश आहे. (Marathi Tajya Batmya)

वाचकाला विषयासंबंधी गोंधळात न टाकता तो थेट काय आहे हे सांगणारं पुस्तकाचं शिर्षक 'पोलीस, जनता व प्रसारमाध्यमे' हे समर्पक वाटतं. हे पुस्तक कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाच्या ज्ञानात तर भल घालेलच पण त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त आहे. विशेषतः ज्यांचं आपल्या अवतीभवती घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक आणि प्रशासकीय बाबींवर लक्ष असतं, किंबहुना 'नागरी समस्या' हा ज्यांचा अभ्यासाचा विषय आहे, अशांनी तर हे पुस्तक संदर्भासाठी संग्रही ठेवायला हरकत नाही.

प्रतिक्रिया नोंदवा - amit.ujagare@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT