Road Tax esakal
Trending News

Road Tax : मंत्र्यांच्याच नाही तर या पाच प्रकारच्या गाड्यांना द्यावा लागत नाही टोल, जाणून घ्या तुमची गाडी आहे का टोल फ्री?

Road Tax : काहीवेळा असं लक्षात येतं की, काही गाड्यांना टोल न घेता सोडले जाते. असं का होतं

सकाळ डिजिटल टीम

Road Tax Rules :

रस्त्यावरील करासाठी घेतल्या जाण्याऱ्या कराला वाहन टोल असे म्हटले जाते. हा टॅक्स यासाठी आकारला जातो ज्यामुळे, देशभरातील रस्त्यांची कामे आणि हायवे मेंटेन केले जातात. रस्ते वाहन टोल घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ने काही नियम बनवले आहेत. ज्याचे पालन करणे हे प्रत्येक देशवासियाचे काम आहे.

तुम्हीही कधी टोलच्या रांगेत थांबले असाल. आणि काहीवेळा असं लक्षात येतं की, काही गाड्यांना टोल न घेता सोडले जाते. असं का होतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या टोलमधून काही गाड्यांना सूट दिली जाते. ती का दिली जाते आणि असं कशाबद्दल केलं जातं हेच जाणून घेऊयात.

अनेक रोड नेटवर्कसाठी वेगवेगळे टॅक्स आकारले जातात. एनएचआयईने टोलसाठी कडक नियम बनवले आहेत. टोल किती भरावा लागणार आहे हे गाड्यांच्या आकारावरून दर निश्चित केले जातात. म्हणजेच, ट्रक आणि बस अशा जड वाहनांसाठी अधिक कर आकारला जातो.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार, गाडी,ट्रक, ट्रॅक्टर,जीप, ट्रॉली या वाहनांना नॅशनल हायवे आणि एक्स्प्रेसवेचा वापर करण्यासाठी १०० टक्के सूट दिली जाते. म्हणजे, या रोडचा वापर केल्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टोल भरावा लागत नाही. तसेच, टू व्हिलर गाड्यांना टोल भरावा लागत नाही.

काही स्पेशल गाड्यांना दिली जाते सूट

आप्तकालीन परिस्थितीत गाड्यांना टोल आकारला जात नाही. म्हणजेच, सैन्याच्या गाड्या, सार्वजनिक वाहने, रूग्णवाहिका यांना टोक आकारला जात नाही. तरीही जर वाहकाकडून टोल आकारला गेला तर तो याची तक्रार करू शकतो.

२४ तासांच्या किती भरावा लागतो टोल

टोल आकारण्यासाठी बनवलेल्या नियमात आणखी एक फायद्याचा नियम आहे. तो म्हणजे, जर वाहन 24 तासांच्या आत दोनदा बूथ पास करत असेल तर एकूण रोड चार्जच्या फक्त दीडपट टोल त्यांना भरावा लागतो. नियमानुसार एकापेक्षा जास्त वेळा येणाऱ्या प्रवाशांना एकूण बूथ कराच्या फक्त दोन तृतीयांश रक्कम भरावी लागेल.

या गाड्यांना कधीच द्यावा लागत नाही टोल

  • रूग्णवाहिका,फायर ब्रिगेड अशा संकटकाळी लागणाऱ्या गाड्यांना टोल द्यावा लागत नाही.

  • ट्रक, सैन्याची वाहने जसे कार, सुरक्षा विभागातील गाड्यांना टोल भरावा लागत नाही.

  • भारताचे राष्ट्रपती,पंतप्रधान,मुख्यमंत्री, संसदीय सदस्य, उच्च न्यायालयातील न्यायाधिश अशा उच्चपदस्थ लोकांना टोल भरावा लागत नाही. तसेच, त्यांच्यासोबत आलेल्या ताफ्यातील गाड्यांनाही टोल भरावा लागत नाही.

  • तसेच, परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्ति चक्र विजेत्यांनाही टोल भरावा लागत नाही.

  • सार्वजनिक वाहतूक, राज्य बसेस यांना टोल भरण्यातून सूट देण्यात आली आहे. तसेच, टू-व्हीलरलाही टोल भरावा लागत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haj Airfare Hike : हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाची बातमी! विमानभाड्यात १०,००० ची वाढ; AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी संतापले, केंद्र सरकारवर केली सडकून टीका

Pune Satara Highway Traffic: सलग सुट्ट्यांचा फटका: पुणे-सातारा महामार्गावर नसरापूर-कापुरहोळदरम्यान सहा किमीपर्यंत भीषण वाहतूक कोंडी

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

Mumbai Local Block: नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द; मध्य व ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक

IPL 2026 : “वैभव सूर्यवंशीची नेमकी कमजोरी शोधणे कठीण”; इयान बिशप यांनी RR च्या युवा फलंदाजाचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT