Twin Girl
Twin Girl Sakal
Trending News

सर्व काही एकाचवेळी! जुळ्या बहिणींना हवंय एकाच वेळी एकाच जोडीदाराकडून बाळ

सकाळ डिजिटल टीम

दोन सारख्या दिसणाऱ्या तरूणी. ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये राहतात. विशेष म्हणजे त्या फक्त दिसायलाच सारख्या नाहीत तर दिवसांतील प्रत्येक गोष्ट एकाच वेळी करतात. अंगावरील कपडेही सारखेच घालतात, सारखंच खातात, एकाच बेडवर झोपतात तर चक्क अंघोळसुद्धा एकाचवेळी करतात. त्यांचं वय आहे ३५ वर्षे. पण सध्या एकाच पुरूषांकडून गरोदर राहण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

ही गोष्ट ऐकून तुम्हाला सुरूवातील विश्वास बसणार नाही. पण हो. ही गोष्ट खरी आहे. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या ३० वर्षीय या तरूणींचं नाव अॅना आणि लुसी डेंसिक असं आहे. दरम्यान त्या आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोबत घालवतात अशी माहिती आहे. त्या मागच्या ११ वर्षापासून बेन या तरूणासोबत राहतात. त्या मागच्या अकरा वर्षापासून या तरूणासोबत एकाच बेडवर झोपल्या आहेत.

सध्या त्या या तरूणापासून एकाच वेळी गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न करत असून अॅना म्हणाली की, "आम्ही या अगोदर एकदाही गरोदरपणाची चाचणी केली नाही. आमच्यासाठी आम्ही गरोदर आहोत की नाही हे तपासणं आश्चर्याचं असणार आहे. आम्ही आता ३५ वर्षाचे आहोत त्यामुळे आम्हाला आता बाळ पाहिजे." असं या जुळ्या बहिणीतील अॅना म्हणाली.

दरम्यान, या विषयी बोलताना लुसी म्हणाली की, "खरं सांगायचं झालं तर आम्हाला दोघींनासुद्धा एकाच वेळी बाळ होणं अपेक्षित आहे. मला हृदयविकाराचा झटका आला होता कारण मला वाटलं की, अॅना गरोदर आहे आणि मी गरोदर नाही. आम्ही एकाच व्यक्तीपासून गरोदर राहण्याची तयारी केली आहे" असं लुसी म्हणाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काही ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT