Viral video shows elderly woman crossing damaged bridge in Bokaro esakal
Trending News

Video : आज्जी बाई मोडकळीस आलेल्या पूलावरून निघाल्या, पण बघताना प्राण आले कंठाशी! तेवढ्यात....; पाहा धडकी भरवणारा व्हिडीओ

Viral video shows elderly woman crossing damaged bridge in Bokaro : बोकारो जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या पुलावरून एका वृद्ध महिलेने जीव धोक्यात घालून केलेला प्रवास सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रशासनाने तातडीने दखल घेत दुरुस्तीचे आदेश दिले

Saisimran Ghashi
  • वृद्ध महिला मोडकळीस आलेल्या पुलावरून जीव धोक्यात घालून चालत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

  • नागरिकांच्या तक्रारी आणि सोशल मीडियावरील संतापामुळे प्रशासन हलले.

  • जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दुरुस्तीचे आदेश देत कारवाई सुरू केली.

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या लोखंडी पुलावरून नदी पार करत असल्याचे पाहायला मिळते. झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील चांपी गावातील ही घटना असून पुलाची अवस्था इतकी वाईट आहे की कोणतीही छोटीशी चूक त्या वृद्ध महिलेला गंभीर इजा किंवा जीव गमावण्यास कारणीभूत ठरली असती.

व्हिडीओमध्ये दिसते की, अर्धा पूल अजून थोडकाच सावरण्याजोगा असला तरी दुसऱ्या अर्ध्या भागात फक्त गंजलेले लोखंडी रॉडच शिल्लक राहिले आहेत. अशा या अर्धवट पडलेल्या पुलावरून वृद्ध महिला अत्यंत धाडसाने चालत जात आहे. ती दोन्ही बाजूंनी वाकलेल्या रेलिंगला धरून तोल सावरत पुढे सरकत असल्याचे दृश्य अंगावर शहारे आणणारे आहे.

हा व्हिडीओ X वर @dineshwar_15261 या युजरने पोस्ट केला होता. त्यात त्यांनी बोकारोचे जिल्हाधिकारी अजय नाथ झा यांना टॅग करत ही गंभीर बाब लक्षात आणून दिली. त्यांनी लिहिले की, “चांपी गावात गावकऱ्यांना ये-जा करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक वृद्ध आजी अत्यंत कष्टाने पूल पार करत आहेत. कृपया या गंभीर स्थितीकडे लक्ष द्या.” या व्हिडीओला आतापर्यंत ३९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि नागरिकांमध्ये संताप आणि काळजीची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत बोकारोचे जिल्हाधिकारी अजय नाथ झा यांनी त्वरीत पावले उचलली आहेत. त्यांनी ट्विट करत सांगितले की, “@dineshwar जी, मी पेटरवार प्रखंड विकास अधिकाऱ्यांना तात्काळ सविस्तर अहवाल तयार करून दुरुस्तीचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.”
पूर्वी एखाद्या समस्येसाठी अर्ज, निवेदने आणि तक्रारी देऊनही काहीच हालचाल होत नव्हती. मात्र एका छोट्या व्हिडीओमुळे संपूर्ण प्रशासन हलले. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे एक वृद्ध महिला आणि इतर ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलली जात आहेत.

या निर्णयामुळे चांपी गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाच्या वेळीच झालेल्या प्रतिसादामुळे भविष्यातील संभाव्य दुर्घटना टळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र या घटनेमुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो इतक्या वर्षांपासून हा पूल मोडकळीस आलेला असतानाही प्रशासनाने आतापर्यंत दुर्लक्ष का केले? याचे उत्तर अद्याप कोणीच दिले नाहीये

FAQs

  1. हा व्हिडीओ कोणत्या भागातला आहे?

    • झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील चांपी गावातील.

  2. व्हिडीओमध्ये काय दाखवले आहे?

    • एक वृद्ध महिला गंजलेल्या आणि मोडकळीस आलेल्या पुलावरून धोकादायकपणे चालताना दिसते.

  3. प्रशासनाने यावर काय प्रतिक्रिया दिली?

    • बोकारो जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.

  4. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काय परिणाम झाला?

    • सोशल मीडियावरच्या दडपणामुळे प्रशासनाने त्वरीत कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT