उत्तर महाराष्ट्र

स्वच्छतेच्या मोहिमेला १० कोटीच्या अनुदानाचे बळ

संतोष विंचू

येवला - शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करून मर्यादित प्रतिसाद लाभल्याने अखेर केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी अनुदान योजना राबवली आहे. यांतर्गत पुढच्या टप्प्यात घरगुती शौचालय बांधणीसाठी तब्बल ९ कोटी ६५ लाखाचा निधी जिल्ह्यातील पालिकांना मिळाला आहे. यातून तब्बल आठ हजार घरगुती शौचालय उभे राहून स्वच्छता मोहिमेला बळ मिळणार आहे.    

योजनेच्या माध्यमातून शौचालय नसलेल्या कुटुंबियांचा सर्वे करून त्यांना वैयक्तीक शौचालय बांधून देण्यासाठी यापूर्वी दोन टप्यात निधी देऊन वैयक्तीक शौचालये बांधण्याचे उद्दीष्ट्‌यपूर्तीकडे प्रवास सुरु आहे. सर्व शहरांमध्ये नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. ज्या नागरिकांच्या घरात वैयक्तीक शौचालय नाही, अशा कुटुंबाला केंद्र व राज्य शासन बारा हजाराचे अनुदान देते तर तेथील पालिका चौदाव्या वित्त आयोगातुन पाच हजार असे एकुण १७ हजार लाभार्थींना देण्यात आले.यातून यापूर्वी जिल्ह्यात सुमारे ४५ हजार लाभार्थींनी वैयक्तिक शौचालयाचे काम पुर्ण केले असल्याचे सांगितले जाते.
सर्व्हेक्षणानुसार आता नागरीकांकडून आलेल्या मागणीनुसार नव्याने निधी मंजूर करण्यात आलेला आहे.यात सर्वाधिक निधी मालेगाव महापालिका हद्दीत ३ हजार ७०० तर दिंडोरी पालिकेत १ हजार १२४ लाभार्थ्यांना मिळणार आहे.निफाड सारख्या सदन तालुक्याला फक्त ८३ लाभार्थी असून इतर पालिकांनी यापूर्वीचे उद्दिष्टपूर्तीनंतर शिल्लक राहिलेल्या कुटुंबीयासाठी हा निधी दिला जाणार आहे. यामुळे सार्वजनिक वापर करणार्या सर्वसामान्य व आर्थिक कमकुवत असलेल्या कुटुंबियांच्या  दारापुढे स्वतचे शौचालय उभे राहणार आहे.

“यापूर्वी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या अनुदानातून स्वच्छ भारत अभियानाचे प्रभावीपणे काम झाले आहेत. राहिलेल्या कामाला आता मिळणाऱ्या निधीने गती मिळणार आहे.नागरिकांनी देखील स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन स्वच्छ भारत अभियानात योगदान द्यावे.”
संगीता नांदुरकर,
मुख्याधिकारी,येवला  

असा मिळणार पालिकांना निधी...
नाशिक - १३६९ - १ कोटी ६४ लाख
मालेगाव - ३७४५ - ४ कोटी ४९ लाख
निफाड  - ८३  - ९ लाख ९६ हजार 
पेठ  -  ९१  - १० लाख ९२ हजार
सिन्नर -  १३३ - १५ लाख ९६ हजार
इगतपुरी - १५१ - १८ लाख १२ हजार
नांदगाव -  १५९ - १९ लाख ०८ हजार
सटाणा - १५९ - १९ लाख ०८ हजार
येवला   -  १९६ - २३ लाख ५२ हजार
मनमाड  - २२७ - २७ लाख २४ हजार
देवळा - २५७  - ३० लाख ८४ हजार
सुरगाणा - ३५१ - ४२ लाख १२ हजार
दिंडोरी  - ११२४ - १ कोटी ३४ लाख
एकूण  - ८०४५ - ९ कोटी ६५ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT