नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची सुरू असलेली पडताळणी.
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची सुरू असलेली पडताळणी. 
उत्तर महाराष्ट्र

वैद्यकीय प्रवेश कागदपत्र पडताळणीसाठी २७ केंद्रे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना विद्यापीठाचा त्यासाठी विचार का केला जात नाही, या संबंधाने पाठपुरावा केला होता. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने त्याची दखल घेत यंदा कागदपत्र पडताळणीसाठी नाशिकसह २७ केंद्रे सुरू केली.

‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., फिजिओथेअरपी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणीचा कार्यक्रम जाहीर झाला. याच कालावधीत मुसळधारेने हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करता आली नाही. अशा विद्यार्थ्यांना शुक्रवारी (ता. ५) सर्व केंद्रांवर कागदपत्रांची पडताळणी करता येणार आहे.

तसेच गुरुवारी आणि शुक्रवारी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अशा विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी शनिवारी (ता. ६) सर्व केंद्रांवर केली जाणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील केंद्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. आतापर्यंत सतराशे विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदविला. आता उरलेल्या दोन दिवसांमध्ये त्यात आणखी विद्यार्थ्यांची सोय होईल, अशी माहिती केंद्रनिरीक्षक डॉ. उदयसिंह रावराणे यांनी सांगितले. 

मुंबईत ४, नागपूरमध्ये ३, तर पुण्यात २ केंद्रे
कागदपत्रांच्या पडताळणीसाठी मुंबईत चार, नागपूरमध्ये तीन, पुणे, औरंगाबाद, नांदेडमध्ये प्रत्येकी दोन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, वर्धा, अकोला, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ येथे एक केंद्र सुरू आहे. दिव्यांग आणि अनिवासी भारतीयांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची व्यवस्था मुंबईतील केंद्रात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागांत केंद्र सुरू करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. 

दाखला उपलब्धतेचा प्रश्‍न
वैद्यकीय प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांना दाखले न मिळाल्याने परतावे लागत आहे. कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनीकडे अधिवासाचा दाखला नसल्याने तिच्याकडे कारण विचारल्यावर दाखला मिळाला नसल्याचे कारण दिले.

वैद्यकीय पदवीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून कागदपत्र पडताळणीच्या केंद्रांची संख्या चारवरून २७ करण्यात आली आहे. त्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचाही समावेश करण्यात आला आहे.
- गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT