A police team present during the interrogation of the suspects with the stolen truck from Jalgaon esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : जळगावहून ट्रकचोरी करणारे तिघे सराईत धुळ्यात जेरबंद; चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : जळगाव शहरातून ट्रकचोरी करून धुळ्यात येणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांना चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून साडेसात लाखांचा चोरीचा ट्रक जप्त केला. तिघांना ट्रकसह जळगाव एमआयडीसी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

जळगाव शहरातून चोरीस गेलेला ट्रक (एमएच १९, सीवाय ५३१०) धुळे शहराकडे येत असल्याची माहिती बुधवारी (ता. ३१) रात्री चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांना मिळाली. (3 truck thieves from Jalgaon jailed in Dhule crime news)

त्यांनी तत्काळ शोधपथकाचे एस. पी. पाथरवट, ए. व्ही. वाघ, एम. एच. पाटील, आर. डी. पवार, एस. एस. बेग, ए. आर. शेख, ए. ए. वैराट व एस. बी. सोनवणे यांना संशयित वाहनाबाबत शोध घेण्याची सूचना दिली. त्यानुसार पथकाने चाळीसगाव रोड चौफुलीवर संशयित वाहनाला अडविले. चालकासह तिघांकडे कागदपत्राची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

संशय बळावल्याने पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी ट्रक जळगाव शहर एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतून चोरून आणल्याची कबुली दिली. त्यावरून साडेसात लाखांचा ट्रक जप्त करत तिघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तिघांनी त्यांची नावे नवाज सादिक सय्यद (रा. तांबापुरा, साईबाबा मंदिराजवळ, जळगाव), सय्यद राशीद शेख (रा. रामरहीम कॉलनीजवळ, सेंधवा, मध्य प्रदेश), आवेसखान जहाँगीर खान (रा. इस्लामपुरा, गरीब नवाजनगर, नशिराबाद, जळगाव) अशी सांगितली.

तथापि, तिघांवर जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. तिघे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषीकेश रेड्डी व पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT