Nashik-Flood
Nashik-Flood 
उत्तर महाराष्ट्र

पुरामुळे चार बळी, चार हजार कुटुंबे विस्थापित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - जिल्ह्यात १२ दिवसांत सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाला. मुसळधारेने चार जणांचे बळी गेले असून, चार हजारांवर विस्थापित झालेले कुटुंबे निवारा शेडमध्ये आश्रयाला आहेत. धरणक्षेत्रात अद्यापही पाऊस सुरू असून, २७ हजारांहून अधिक क्‍यूसेकने विसर्ग सुरूच असल्याने पूरस्थिती कायम असलेल्या भागात नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले नाहीत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर बुधवार (ता.७)पासून पूर कमी झालेल्या भागात पंचनाम्यांना सुरवात झाली. त्यामुळे बाधित झालेल्या कुणालाही निवारा शेडमधील भोजनवगळता सरकारी मदत मिळालेली नाही. अजूनही बराच भाग पाण्यात असल्याने नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट व्हायला आणखी दोन दिवस लागतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

गंगापूर, दारणा आणि पालखेड अशा तिन्ही प्रमुख समूहातील धरणालगतच्या दीडशेहून अधिक गावांना पुराचा फटका बसला आहे. नाशिक, निफाड, बागलाण, मालेगाव, पेठ या पाच तालुक्‍यांना मोठी झळ बसली आहे. पुरामुळे कोलमडलेली वीज व पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत झालेली नाही. 

आज सायंकाळी नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून २७ हजार १२३ क्‍यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. शहरात होळकर पुलावर ६२९७ क्‍यूसेकने विसर्ग सुरू होता. शहर-जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असून, विस्थापितांच्या व्यवस्थेत व्यस्त यंत्रणेकडून अजून पूर्ण क्षमतेने पंचनामे संथ गतीने सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुख्यमंोत्री फडणवीस यांनी बुधवारी नाशिकसह राज्यातील पूरबाधित जिल्ह्यांचा आढावा घेत पंचनाम्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दोन दिवसांपासून पुरामुळे विस्थापित झालेल्यांच्या स्थलांतर व संगोपनात व्यस्त असलेली यंत्रणा आजपासून पंचनाम्याच्या कामाला लागली. अनेक भागातील शेती, शाळा, व्यावसायिक आस्थापना, बाजार, वीज व्यवस्थेसह शेतकरी कुटुंबाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. बंधारे, विजेचे खांब, वाहिन्या वीज उपकेंद्र, शाळांच्या इमारतीच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे.

पाच तालुक्‍यांना पुराचा फटका 
जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांना पुराचा फटका बसला आहे. त्यात निफाड दोन हजार ६०२, नाशिक ३१६, बागलाण ३४५, मालेगाव २५०, पेठ २५० यासह लहान-मोठ्या गावात एकूण तीन हजार ९४० कुटुंबे विस्थापित झाली आहेत. त्यात सायखेडा ८१२, चांदोरी ७९७, ओझर २१५, सुकणे- दिघी १४१, चाटोरी १६२, रोकडोबावाडी २५०, यांचा समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT