jalgaon
jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

पाच विभक्त पती-पत्नी आले एकत्र

सकाळवृत्तसेवा

जळगाव : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या "महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत झालेल्या जनसुनावणीतील समुपदेशनामुळे जिल्ह्यातील पाच कुटुंब (पती-पत्नी) पुन्हा एकत्र नांदावयास तयार झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी आज दिली. 

पीडित महिलांना जलदगतीने त्यांच्या जिल्ह्यातच न्याय मिळावा, यासाठी आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांच्या पुढाकाराने "आयोग आपल्या दारी' हा उपक्रम आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात राबविण्यात आला. या उपक्रमाची माहिती देताना पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन शुभांगी भारदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर उपस्थित होते. 

अध्यक्षा रहाटकर म्हणाल्या, की आजच्या जनसुनावणीत 63 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 40 तक्रारी वैवाहिक समस्येविषयीच्या होत्या. यातील दोन तक्रारी या पुरुषांनी केलेल्या होत्या. दोन तक्रारी आर्थिक फसवणुकीच्या, कामाच्या ठिकाणी लैगिंक छळाच्या दोन, तर कामाच्या ठिकाणी छळाच्या दोन, याबरोबरच शेतीमध्ये वाटाहिस्सा न देणे, येण्या-जाण्यासाठी रस्ता न देणे, ठेवीसंबंधीच्या आहेत. 

जिल्ह्यास मंजूर झालेले कौटुंबिक न्यायालय सुरू करणे, अवैध दारू विक्री बंद करणे, दारूबंदीचा ठराव झालेल्या गावात दारूबंदीची कारवाई करणे, न्यायालयाने निकाल देऊनही शेतीचा ताबा न देणे, मुलांचा ताबा आईला न मिळणे यासंबंधीच्या तक्रारी व निवेदनेही या जनसुनावणी प्राप्त झाली आहे. या तक्रारी संबंधित विभागाकडे देऊन त्यावर येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जनसुनावणीसाठी दोन पॅनल 
अल्पबचत भवनात आज सकाळी जिल्हाभरातून आलेल्या महिलांच्या तक्रारीची जनसुनावणी घेण्यासाठी दोन पॅनल तयार करण्यात आलेले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे, मनोजकुमार राठोड, विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्या ऍड. महिमा मिश्रा, ऍड. रूपाली भोकरीकर, समुपदेशक वैशाली पाटील, सुमन कोलते, संरक्षण अधिकारी महेंद्र बेलदार, आरती साळुंखे यांनी काम पाहिले. याप्रसंगी आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर, आयुक्त चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनीही या पॅनलमध्ये सहभागी होऊन तक्रारी जाणून घेतल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT