Religious-Place
Religious-Place 
उत्तर महाराष्ट्र

सहाशे सत्तेचाळीस धार्मिक स्थळे अनधिकृत

सकाळवृत्तसेवा

नाशिक - शहरातील मोकळ्या भूखंडांवरील धार्मिक स्थळे अनधिकृत ठरविल्याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकेवर सुनावणी करताना महापालिकेला फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणाची यादी जाहीर केली असून, त्यात ६४७ धार्मिक स्थळे अनधिकृत ठरवली आहेत. २४२ धार्मिक स्थळे नियमित केली जाणार आहेत. अनधिकृत ठरविलेल्या धार्मिक स्थळांबाबत हरकती व सूचनांसाठी महिन्याची मुदत दिली आहे.

सन २००९ पूर्वीची व नंतरची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने महापालिकेने कारवाई सुरू केली होती.

त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने ५ मे २०११ च्या शासननिर्णयानुसार कार्यवाहीचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने त्यानुसार धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण केले. त्यानुसार महापालिकेने यादी प्रसिद्ध केली. त्यात सहा विभागांतील एकूण ८८९ धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले. त्यात प्राचीन २४२ धार्मिक स्थळे नियमित करण्यात आली. सर्वेक्षण करताना ‘अ’ व ‘ब’ वर्गीकरण करण्यात आले.

‘ब’ वर्गात निष्काषित व स्थलांतरित होऊ शकतील अशा धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला. ८८९ पैकी ५७६ धार्मिक स्थळे निष्काषित व स्थलांतरित होऊ शकतील. त्यासाठी नियमानुसार प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. 

फेरसर्वेक्षणात आढळलेल्या धार्मिक स्थळांपैकी ७१ स्थळे तातडीने निष्काषित केली जाणार आहेत. त्यात पूर्व विभागातील ९, पश्‍चिम ५, सातपूर २२, पंचवटी १२, नाशिक रोड २, सिडको ७, तर सिडको प्रशासनाच्या हद्दीतील १४ अनधिकृत धार्मिक स्थळांचा समावेश आहे. हरकतींसाठी महापालिकेच्या नगरनियोजन विभागाकडे अर्ज सादर करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT