aandarsul
aandarsul 
उत्तर महाराष्ट्र

अंदरसूल - पोल्ट्री उत्पादकांच्या पोटात मक्याने आणला गोळा 

संतोष घोडेराव

अंदरसूल - सर्वाधिक पेरणी असलेल्या मका पिकाने गेल्या तीन ते चार वर्षांत जिल्ह्यासह थेट तामिळनाडूपर्यंत पोल्ट्री उद्योगाला हातभार लावला आहे. यंदा मात्र हेच पीक तालुक्यात मोडून पडल्याने सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होणार आहे.यामुळे येणारा हंगाम कसा जाणार व खाद्य महागणार असल्याच्या या विचाराने पोल्ट्री व्यावसायिकांच्या पोटात गोळा येत आहे.
मकाचे तालुक्यात यावर्षी ३३ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट होते.यात येवला मंडळात 12 हजार,अंदरसुल व पाटोदयात 11 हजार 500 हेक्तरवर मकाची पेरणी झाली आहे.विशेष म्हणजे अपेक्षित क्षेत्राच्या तुलनेत 191 टक्के इतकी पेरणी झाली आहे.

सुरवाती पासूनच अवर्षणग्रस्त असलेल्या येवला तालुक्याच्या जणू काही पाचवीलाच दुष्काळ पुंजला की काय अशी म्हणण्याची वेळ आल्याने यंदा बळीराजाने   आपल्या कुटुंबाच्या पोटची खळगी भरण्यासाठी  लक्ष्मीच्या गळ्यातील सौभाग्यच लेन मोडून यंदा उशिरा बरसलेल्या वरुणराजाच्या भरवशावरच अगदी काळजावर दगड ठेवून पिक पेरणी केली.मात्र पावसानेच वेळेवर दगा दिल्याने पिकाचे उत्पादन मिळण्यापूर्वीच सम्पूर्ण पिकाचेच मातेरे झाल्याने शेतकरी ही पूर्णतः अडचणीत सापडला आहे.पहिल्याच पावसानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतात उभे असलेल्या पिकांची पाण्या अभावी पिकांची वाढ संपल्याने शेतात पिक फ़क्त नावालाच उभे राहिले आहे. असून उत्पादन मात्र शून्य असेच चित्र सर्वत्र दिसून येत आहे.पावसाचे प्रमाणे कमी असल्याने मका उत्पादनात मोठी घट होणार असल्याने पोल्ट्री व्यवसाय संकटात असल्याने उत्पादकांना ही याचा मोठा फटका बसणार आहे.त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांच्या पोटात मकाने गोळा आणला आहे . 

यंदा पावसाने दगा दिल्याने खाद्य ही महागणार असून पोल्ट्रीतील पक्षांना ही सहाशे रुपये प्रति टैंकर प्रमाणे दिवसाला दोन वेळा पाणी पाजण्याची वेळ आली आहे."
अरुण देवरे ,पोल्ट्री चालक,देवठाण

या वर्षी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळाले नसल्याने शासनाने दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा " माधव गायकवाड़, गवंडगाव शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT