MNP nashik
MNP nashik 
उत्तर महाराष्ट्र

महापौरांच्या घरात आयुक्त मुंडे यांच्यावरुन बंद दाराआड शाब्दिक चकमक (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून सत्ताधारी भाजपची झालेली कोंडी व गेल्याकाही दिवसांपासून करवाढीवरून सुरू असलेला वाद त्यातच पुढील महासभेत बससेवेचा प्रस्ताव दाखल झाल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपने बोलाविलेल्या बैठकीत नियमित विषय बाजूला राहून शहरातील तीन आमदार विरुद्ध पदाधिकारी अशी शाब्दिक चकमक आज पहायला मिळाली.



महापौरांच्या रामायण निवासस्थानी बंद दरवाजाआड झालेल्या या वादातून भाजपची पक्षांतर्गत लक्तरे उडाल्याचे दिसून आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समोर पक्षांतर्गत वादाचा एक अध्याय शनिवारी संपल्यानंतर आज पक्षाच्या नगरसेवकांना वादाचा दुसरा अध्याय पाहायला मिळाला.

महापौर रंजना भानसी यांच्या रामायण निवासस्थानी आज भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीत आमदार बाळासाहेब सानप आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

महापालिका आयुक्त मुंढे यांनी शहर बससेवेचा ठेवलेल्या प्रस्तावावरून वादाला सुरुवात झाली आमदार फरांदे यांनी प्रस्ताव चांगला असल्याचे सांगताच सदस्यांचा भडका   झाला आमदार फरांदे यांच्या भूमिकेला सर्वच नगरसेवकांनी प्रखर विरोध केला सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तीन आमदारांवर राग व्यक्त केला आमदार आपसात भांडत असताना आमदारांचे एकमेकांमध्ये जमत नसल्यानेच पक्षांतर्गत शाब्दिक चकमक उडाल्याचा आरोप केला.

करवाढीमुळे शेतकरी भरडला जाणार आहे, आमदार स्वार्थासाठी राजकारण करत आहेत. सुप्त स्वतःचा विचार करतात पक्षाला नाशिककरांच्या प्रश्नाचे काही पडलेले नाही असा आरोप केला. वाद इतका विकोपाला गेला की भाजपच्या जुन्या नेत्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. आता ही पूर्वीची भाजप राहिली नसल्याचे खंत व्यक्त करण्यात आली. दरम्यान, शहर बससेवेसंदर्भात विशेष महासभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT