Aditi Lele
Aditi Lele 
उत्तर महाराष्ट्र

खानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा !

शंकर भामेरे

पहूर, ता. जामनेर : "अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे " ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस विद्यापीठातून त्यांनी पक्षी विज्ञानात संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त करून पहूरचा लौकीक सातासमुद्रापार नेला.

पहूर येथील कर्मयोगी स्वर्गीय कॅप्टन डॉ. एम. आर. लेले यांची नात आणि डॉ. भारती लेले व डॉ. अच्युत लेले यांची मुलगी अदीती लेले यांनी पर्यावरण संवर्धनाच्या ध्यासापोटी हे संशोधन हाती घेऊन पुर्णत्वास नेले. त्यांचे प्राथमिक शिक्षक जळगांव मनपा शाळेत झाले. पहूरच्या आर .टी. लेले हायस्कूलची माजी विद्यार्थीनी असलेल्या आदीती यांनी पुण्यातील गरवारे  विज्ञान महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. सुक्ष्म जीवशास्त्र या विषयात त्यांनी पदव्युत्तरपदवी संपादन केली. पुढे सतत तीन वर्षे त्यांनी कोची (केरळ) येथील जंगलांमध्ये पर्यावरणाचा अभ्यास केला. त्यानंतर गेल्या सात वर्षांपासून त्यांचे अमेरिकेत संशोधण कार्य सुरू होते. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्ल त्यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

काय आहे संशोधन?
भारतीय पाश्चिम घाटातील वृक्षराजी आणि पक्षी यांचे सहजीवन, हॉर्नबील पक्षांचा अधिवास, पर्यावरण आणि पक्षांचे संवर्धन या विषयी आदीती लेले यांनी संशोधन केले .
या संशोधनामुळे पर्यावरण संतुलनासाठी देशाला फायदा होणार आहे.

पहूरला आनंदोत्सव
कर्मयोगी स्वर्गीय कॅप्टन  डॉ .एम.आर. लेले यांनी पहूरमध्ये गोरगरीब जनतेची सेवा केली. त्यांच्या संस्कारातून प्रेरणा घेत डॉ .लेले दाम्पत्य आज हा वसा जोपासत असून अदीती लेले यांच्या रूपाने हा वारसा पुढील पीढीकडे गेला आहे. त्यांच्या यशाने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला . अमेरिकेत येत्या15 डिसेंबर रोजी होणाऱ्या पदवी प्रदान सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT