धुळे - नागपूर येथील विदर्भ कार्टुनिस्ट असोसिएशनतर्फे नुकतेच नागपूर येथे ‘बिग-बी @ ७६’ या विषयावर अर्कचित्र व व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात धुळ्याचे व्यंगचित्रकार भटू बागले यांच्या कलाकृतींचाही समावेश होता. बागले यांच्या कलेचे अमिताभ बच्चन यांनी यावेळी कौतुक केले.
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. देश-विदेशांतील ७० कलाकारांच्या १५० कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. त्यात राज ठाकरे, संजय मोरे, मनोज सिन्हा, सतीश उपाध्याय, गजानन घोंगडे, उमेश चारोळे, अमोल ठाकूर आदी व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश होता. धुळ्याचे रहिवासी व व्यंगचित्रकार बागले यांच्या कलाकृतीही प्रदर्शनात मांडल्या होत्या. बागले यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमिताभ बच्चन यांना त्यांचेच अर्कचित्र भेट दिले. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी बागले यांच्या कलेचे कौतुक केले. या प्रदर्शनासाठी सेंट जॉन हायस्कूलचे कलाशिक्षक संजय मोरे, मुख्याध्यापक फादर पत्रस तिरकी, उपमुख्याध्यापक फादर विश्वास तोरन यांचे विशेष योगदान लाभले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.