छापा पडताच कुंटणखाना मालकीण फरार
छापा पडताच कुंटणखाना मालकीण फरार  
उत्तर महाराष्ट्र

छापा पडताच कुंटणखाना मालकीण फरार ; एजंटसह सात संशयीतांना अटक

सकाळ वृत्तसेवा


जळगाव, ता. 1 : अमळनेर शहरातील गांधीलपुरा भागात जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून आज छापा टाकला. कुंटणखाना मालकीण पळून जाण्यात यशस्वी ठरल्या असून, सात संशयितांना अटक करण्यात आली आहे. कारवाईत पथकाने सात महिलांची सुटका केली असून, अमळनेर येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील कुंटणखान्याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे. वेळोवेळी पोलिस दलाची कारवाईही झाली आहे. मात्र, तरी अमळनेरमधील वैश्‍या व्यवसायावर नियंत्रण आलेले नाही. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेने नियोजनबद्धरीत्या गांधलीपुरा भागात छापा टाकला. वरिष्ठ निरीक्षक बापू रोहोम यांच्या गुप्त माहितीनुसार तेथे अवैध पद्धतीने महिलांना वैश्‍या व्यवसाय करण्यास आणले जात असल्याच्या माहितीवरून सहायक निरीक्षक स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक नीता कायटे, सुनील दामोदरे, राजेश मेंढे, अनिल देशमुख, विनोद पाटील, शरद भालेराव, शेख युनूस, ललिता सोनवणे, मीनल साकळीकर, सविता परदेशी यांच्या पथकाने जुलेखाबी रशीद ऊर्फ ज्युली, सुलताना ऊर्फ भिकी रशीद या दोघींच्या घरांवर छापा टाकला. दोघींच्या घरांत संगीता संदानशिव (वय 40), सना ऊर्फ रानी शेख शाहरुख (वय 20), रिना अर्जुन पारधी (वय 26), सईदा शेख रफिक (वय 25), रुखसाना अनिस ऊर्फ रेखा शिवाजी लोणकर (वय 32), कशीश शेख अनिस (वय 22), अफसाना राजू काझी (वय 27) यांना अडकून ठेवत त्यांच्यामार्फत व्यवसाय चालवला जात असल्याचे आढळून आले. 
 

एजंटलाही अटक 
पोलिस छाप्यात ग्राहक आणणारे बबलू शेख रशीद (वय 28), रफिक शेख रशीद ऊर्फ काजल (वय 34), अमजद शेख रशीद (वय 35) यांनाही कुंटणखाना चालवताना आढळून आलेल्या ताहेरा शेख बाबूलाल (वय 53), फरिदा राजू काझी (वय 35) यांच्यासह अटक करण्यात आली आहे.

सट्टापेढीही सोबतच! 
गुन्हे शाखेने वेश्‍या वस्तीत छापा टाकल्यानंतर तेथे पोलिसांना सट्टा- जुगाराचे साहित्य आढळून आले. कल्याण मटक्‍याच्या चिठ्ठ्या पथकाने पंचनामा करून ताब्यात घेतल्या. कुंटणखान्यातून मोबाईलसह सुमारे 11 हजार 100 रुपये रोख मिळून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT