Woman-Delivery
Woman-Delivery 
उत्तर महाराष्ट्र

बिहारच्या महिलेची रेल्वेस्थानकात प्रसूती

सकाळवृत्तसेवा

जळगाव - येथील रेल्वेस्थानक फलाट क्रमांक तीनवर गोवा डाउन एक्‍स्प्रेस थांबली. अत्यवस्थ स्थितीत गरोदर महिलेला उतरविण्यात आले. तत्काळ रेल्वे प्रशासन व सफाई कामगार महिला मदतीला धावून आल्या. पंधरा मिनिटांत महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला अन्‌ सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. माता अन् चिमुकल्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हसनबीबा फरीयाज अन्सारी (वय २२) असे महिलेचे नाव आहे. ती पतीसह गोवा येथून शुक्रवारी दुपारी सव्वातीनला गोवा डाउन एक्‍स्प्रेसने प्रवास करीत होती. बिहारमधील इनरव्हा येथे जायचे होते. प्रसूतीसाठी अजून महिना बाकी होता. दरम्यान, तासाभरापूर्वीच तिचे पोट दुखायला लागले. कळा येत असल्याने येथील रेल्वेस्थानकात थांबण्याचा निर्णय घेतल्याचे पती फरीयाज यांनी सांगितले.

गोवा एक्‍स्प्रेसमध्ये गरोदर महिला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली अन्‌ पोलिस कर्मचाऱ्यांसह सफाई कामगार या ठिकाणी एकत्र आले. रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक तीनवर शेवटी गाडी थांबविण्यात आली. हसनबिबा यांना फलाटावर उतरविण्यात आले. महिला पोलिस अन्‌ सफाई कामगारांनी साड्या आडव्या लावून महिलेला आत घेतले. या ठिकाणी ‘नॉर्मल’ ही महिला प्रसूत झाली.

डॉ. राजेंद्र पाटलांची मदत
डॉक्‍टरांची गरज असल्याने रेल्वे प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात माहिती  दिली, मात्र या ठिकाणी डॉक्‍टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर डॉ. राजेंद्र पाटील (गेंदालाल मिल) यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेची प्रसूती केली. बाळ जन्माला आल्याचा आनंद रेल्वेस्थानकावर पसरला.

१०८ नंबर दाखल
प्रसूतीनंतर बाळासह महिलेला १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉ. स्वाती पाटील यांनी उपचार सुरू केले. बाळ व महिलेची प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णवाहिकेतील डॉक्‍टर किशोर चव्हाण, चालक संदीप गवळे तसेच रेल्वे पोलिस अनिंद्र नगराळे, योगेश चौधरी, गौतम दुट्टे, योगेश अडकले यांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT