satbhai
satbhai 
उत्तर महाराष्ट्र

पक्षीमित्रांनी दिले सातभाई पक्षाला जीवदान

भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील लोणखेडे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक, पक्षीमित्र राकेश जाधव, गोकुळ पाटील व कढरे (ता.साक्री) येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक संजय पाटील यांनी जखमी सातभाई पक्षाची सेवासुश्रुषा करत त्याला जीवदान देऊन माणुसकीची मूर्त प्रचिती आणून दिली.

सोमवारी (ता. 24) नियमित शाळेत जात असताना लोणखेडे-लामकानी-धुळे रस्त्याच्या कडेला त्यांना अचानक एक सातभाई पक्षी जखमी अवस्थेत दिसला. रस्त्यालगत सातभाई पक्षी जखमी अवस्थेत दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ त्या पक्षाला वाचविण्यासाठी गाडी एक किलोमीटर मागे वळवली. जखमी सातभाई पक्षाच्या चोचीतून रक्त येत होते. ते पाहून तिघांनीही त्याला पाणी पाजून थोडा वेळ अभय दिले व प्रथमोपचार करून आकाशात मुक्त संचार करण्यासाठी सोडून दिले.

"हे सातभाई पक्षी नेहमी सातच्या समूहाने राहतात. तसेच अन्न सेवन करताना नेहमी एक पक्षी झाडावर बसून आजूबाजूला लक्ष ठेवतो, तर इतर सहा सातभाई पक्षी मनमुराद अन्न सेवनाचा आनंद लुटतात. ते 'कुई-कुई' असा सलग आवाज करतात. त्यांचा रंग राखाडी असतो. लांबी सरासरी 35 सेमी असते, तर डोळे पिवळसर असतात."
- राकेश जाधव, जिल्हा परिषद शाळा, लोणखेडे ता.साक्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT