Sameer-Bhujbal
Sameer-Bhujbal 
उत्तर महाराष्ट्र

भाजप-शिवसेनेचे भांडण ही निव्वळ धूळफेक - समीर भुजबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक - आश्‍वासनांची खैरात करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारकडून वचने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे माध्यमांसमोर खोटी भांडणे करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत दिशाभूल चालली आहे, अशी टीका माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी (ता. ३) केली.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली असून, पक्षातर्फे गणनिहाय आढावा बैठकांना सुरवात झाली.
‘एनसीपी कनेक्‍ट’ या मोबाईल ॲपची माहिती देणे, बूथ कमिट्यांचे बळकटीकरण करण्यासाठी गिरणारे, मातोरी, देवरगाव, धोंडेगाव, गोवर्धन, विल्होळी, सिद्धपिंप्री, एकलहरे, पळसे, लहवित गणांत बैठकी झाल्या.

जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नाशिक पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंभळे, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर, माजी अध्यक्षा विजयश्री चुंभळे, माजी शिक्षण सभापती दिलीप थेटे, हिरामण खोसकर, यशवंत ढिकले, निवृत्ती अरिंगळे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सचिन पिंगळे, लक्ष्मण मंडाले, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, उपाध्यक्ष रामदास पिंगळे, त्र्यंबकेश्‍वर पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र भोये, मनोहर बोराडे, दीपक वाघ आदी उपस्थित होते.

ॲपच्या माध्यमातून कार्यकर्ते
भुजबळ म्हणाले, की प्रत्येक गावातील नागरिकांशी कनेक्‍ट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एनसीपी कनेक्‍ट’ हे ॲप तयार केले आहे. प्रत्येक नागरिक पक्षाशी जोडला जाणार असून, नागरिकांच्या समस्या समजणार आहेत. कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी जोडण्यासाठी हे ॲप महत्त्वाचा दुवा असेल. युती सरकारने देशातील जनतेचा स्वप्नभंग केला आहे. शेतकरी, युवक, महिलांचे प्रश्‍न सरकारला सोडवता आले नाहीत.

एवढेच नव्हे, तर सरकारकडून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतमालाचे भाव पडलेले असताना सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासाची कामे झाली. मात्र युती सरकारच्या काळात विकास खुंटला आहे. जिल्हा आणि तालुका प्रगतिपथावर नेण्यासाठी सरकार बदलण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात निर्धार परिवर्तन यात्रा
राष्ट्रवादी काँग्रेसची १६ आणि १७ जानेवारीला जिल्ह्यात निर्धार यात्रा येणार आहे. त्यामध्ये जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे, असे भुजबळ यांनी म्हटले. आव्हाड यांनी युती सरकारमुळे शेतकरी अडचणीत आल्याची टीका केली. शिवाय देशातील व राज्यातील सरकार बदलावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT