Celebration of all religious community in Nandgaon nashik
Celebration of all religious community in Nandgaon nashik 
उत्तर महाराष्ट्र

न्यायडोंगरीतील सर्वधर्मीय समाजाचा उत्सव थाटात

सकाळवृत्तसेवा

न्यायडोंगरी : येथे सर्वधर्मीय समाजाचा उत्सव म्हणून पंचमीला पाच दिवसांचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळापासून न्यायडोंगरीत पंचमीच्या मुहूर्तावर या पाच दिवसीय महोत्सवाचे गावकरी आयोजन करतात. त्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा विशेष सहभाग असतो. बोहाडा नृत्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. सोमवारी पाच दिवसीय या कलासंस्कृतीच्या महोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली.

समारोपाला अॅड. अमोल आहेर यांनी गावाची श्रद्धा असलेल्या भवानी मातेचे सोंग घेतले होते. पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या या लोकजागरात संभळ सनईच्या सुरांवर विविध लोकगीतांच्या चालीवर जिल्हारिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी भवानीची तलवार हातात घेत पारंपारीक ।बोहाडा नृत्य केले.याप्रसंगी फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला गावाची लेक आपल्या पूर्वसुरींच्या परंपरेचा वारसा घेऊन या सोहळ्यात सहभागी झाल्याचे बघून मोठा जल्लोष करण्यात आला. गावातून निघालेल्या या मिरवणुकीतील भवानीमातेचे घरोघरी पूजन झाले.

संभळ आणि वाजंत्रीच्या पारंपरिक वाद्याच्या तालावर रंगलेल्या या नृत्याला सगळ्यांचीच दाद मिळाली. या हंगामात गावातील पवार गल्लीतून ही सोंगे बोहाडा नृत्यासहकाढली जातात. त्यात गणपती, शारदादेवी, हनुमान, राम-लक्ष्मण,रावण, दशावतार, संक्रात, रक्तादेवी, वीरभद्र, खंडोबा, नरसिंह,महिषासुर आदी सोंगे घेतली जातात. या कार्यक्रमात मुस्लीम व रंगारी समाजाला त्यात मोठा मान दिला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT