Theft
Theft 
उत्तर महाराष्ट्र

सोनसाखळी तोडणाऱ्या भामट्यांना अटक

सकाळवृत्तसेवा

जळगाव - शहरातील गणपतीनगरातील रहिवासी दांपत्य शनिवारी रात्री गणेशदर्शनासाठी बाजारपेठेत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी विवाहितेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून पोबारा केला. ओझरताच दुचाकीचा नंबर पाहून दांपत्याने पोलिसठाणे गाठले. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत अवघ्या तासाभरात कंजरवाड्यातील दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, सोनसाखळीचा तुकडा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

गणपतीनगरातील रहिवासी परेश दिलीप लढ्ढा शनिवारी (ता.१५) सायंकाळी पत्नी रूपाली, आई व दोन्ही मुलांसह बाजारात आले होते. किरकोळ खरेदीनंतर गणपती आरास बघण्यासाठी जात असताना घाणेकर चौकात राजेश क्‍लॉथ दुकानासमोरून दुचाकीने त्यांच्या मागे असलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीस्वार दोघा तरुणांनी रूपाली लढ्ढा यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडून दुचाकी वळवत बळीरामपेठेतील आझाद मित्रमंडळाच्या दिशेने सुसाट पळवून देत ते गायब झाले. दोघा पती-पत्नीने तत्काळ समोरच शहर पोलिस ठाणे गाठून घडला प्रकार सांगितला. पोलिसांना माहिती देताना पळून जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीवर लढ्ढा यांची ओझरती नजर पडल्याने त्यांनी तुटक माहितीसह चारपैकी एक अंक चुकीचा सांगितला होता. 

असा लागला तपास
निरीक्षक एकनाथ पाडळे यांच्या पथकातील संजय हिवरकर, सुधीर साळवे, बशीर तडवी आदींनी दुचाकीच्या (पल्सर) वर्णनावरून शोध घेत कंजरवाडा गाठला. तत्पूर्वी चुकीच्या नंबरची दुचाकी रावेर येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, कंजरवाड्यात एका घराबाहेर उभी दुचाकी गोविंद बागडे याच्या मालकीची असल्याचे आढळून आले. गणपतीची वर्गणी घेण्यासाठी मोठा भाऊ व त्याचा मित्र गाडी घेऊन गेल्याचे गोविंदने सांगितल्यावरून दोघांचा शोध सुरू झाला. 

दिल्लीला पळून जातानाच अटक 
गोविंदचा भाऊ माट्या ऊर्फ आकाश अनिल बागडे, बंटी ऊर्फ गणेश बागडे या दोघांचे नाव निष्पन्न झाल्यावर अतिरिक्त कर्मचारी बोलावून दोघांचा शोध सुरू झाला. सिंधी कॉलनी चौकातून माट्या ऊर्फ आकाशला ताब्यात घेतल्यावर त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत बंटीचे नाव सांगितले. मात्र बंटी सोनसाखळी तोडल्यावर शिवाजी नगरकडे पळून गेला. तेथे, अक्रम शेख, वासुदेव सोनवणे यांनी त्याचा पाठलाग केला.

बंटी रेल्वेस्थानकावरून दिल्ली जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पोलिसांचा सुगावा लागल्याने तो, परत सिंधी कॉलनीकडे येत असताना त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली देत तोडलेल्या, सोनसाखळीचा एक तुकडा काढून दिला. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चार तासांत पोलिसांनी दोघा संशयितांसह गुन्ह्यातील ऐवज ताब्यात घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT