children's day happy sonday docter
children's day happy sonday docter 
उत्तर महाराष्ट्र

सर्वांगीण विकासासाठी डॉक्‍टर्स पाल्यांचा "हॅप्पी संडे' 

अमोल भट

जळगाव : प्रत्येक घरात आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार केले जातातच; परंतु सामाजिक भान, समाजात मिळून मिसळून राहण्याची गरज व त्यासाठी आवश्‍यक संघभावनेची जाणीव करून देण्याच्या उदात्त हेतूने पाच ते दहा या वयोगटातील बालकांसाठी "हॅप्पी संडे' या अनोख्या बालसंस्कार वर्गाचा उपक्रम राबविला जात आहे. 
हा उपक्रम दर रविवारी सायंकाळी 5 ते 7 दरम्यान न्यू लाइफ सर्जिकल हॉस्पिटल, रिंग रोड येथे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रूपाली बेंडाळे यांच्या निवासस्थानी होतो. आजच्या गतिमान जीवनामुळे व बदलत्या राहणीमान व विचारसरणीमुळे पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष त्यामुळे मुलांचा मानसिक कोंडमारा होत असतो. परिणामी, मानसिक तणाव वाढून मुले विविध समस्यांनी ग्रस्त होतात. त्यातून समान वयोगटातील मुलांची मैत्री व्हावी, एकत्रित व्यायाम व्हावा, एकत्रित सकस नाश्‍ता घ्यावा अशा महत्त्वपूर्ण बाबींचा विचारातून "हॅप्पी संडे' या वर्गासाठी मुले एकत्रित येत आहेत. 

असे आहे वर्गाचे स्वरूप 
या योग वर्गात मुलांना किड्‌स योगा, वॉर्मअप, मेडिटेशन, त्राटक आसन, भ्रामरी प्राणायाम, ओंकार साधना आदींद्वारे व्यायाम करण्यात येतात. वर्गात साधारण 30 मुलांचा सहभाग असून बहुतांश मुले शहरातील प्रख्यात डॉक्‍टरांचे पाल्य आहेत. डॉक्‍टर्स पाल्यांच्या बाबीत जागरूक असल्याचे यातून दिसून येते. 

योगा करण्याचे फायदे 
योगा केल्याने मुलांच्या बसण्याची पद्धत सुधारते. मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. शिवाय, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणंही सोपं जातं. मेडिटेशन आणि दीर्घ श्वास यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. मुलांमधील आत्मविश्वास वाढतो. 
 
या वर्गातून योग, व्यायाम, खेळ आदींसाठी प्रोत्साहन दिले जाते. त्यातून सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळी वरील वाढ व विकास व्यवस्थित होतो. खेळण्याने त्यांचे ज्ञान, अनुभव व आत्मविश्वास वाढून कुतूहल जागृत होते गॅझेट च्या या युगात व्यायाम, खेळदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. 
- डॉ. रूपाली बेंडाळे स्त्रीरोग तज्ज्ञ. 

किड्‌स योगा, व्यायाम, वॉर्म अप,मेडिटेशन आदी प्रकार लहानपणापासूनच मुलांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. खेळांमुळे त्यांचे भाषा व विचारसामर्थ्य, निर्णयक्षमता, योजकता व संघटनकौशल्य वाढते. 
- दीपाली देशमुख 
प्रशिक्षिका तथा संचालिका, अनुभूती योग प्राणायाम वर्ग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT