उत्तर महाराष्ट्र

'बजेट'नुसार करावी लागणार 'चॅनल्स'ची निवड!

सकाळवृत्तसेवा

जळगाव - "ट्राय'ने ग्राहकांना चॅनल निवडीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार ग्राहक ज्या चॅनलची निवड करतील त्याचे पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. मात्र, केबल चालकांसह डीटीएच कंपनी ग्राहकांवर पॅकेज सिस्टिम प्रणाली त्यांच्यावर लादत असल्याने "ट्राय'च्या या नव्या धोरणामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. 

टेलिकॉम रेग्युलेटरी ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) ने चॅनल निवडीचे अधिकार ग्राहकांना दिले आहे. संपूर्ण देशभरात एप्रिल महिन्यापासून "ट्राय'चा नियम लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, ग्राहकांना चॅनल निवडीचा अधिकार असताना शहरातील केबल सर्व्हिस प्रोव्हायडर व डीटीएच कंपन्यांकडून ग्राहकांसाठी पॅकेज सिस्टिम सुरू करण्यात आली आहे. परंतु, या पॅकेज सिस्टिममध्ये ग्राहकांना आपल्या निवडीचा अधिकार नसल्याने ग्राहकांनी सर्रास फसवणूक होणार आहे. ती टाळण्यासाठी शासनाने "डीटीएच'धारक कंपन्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

ग्राहकांवर "कॅपॅसिटी' शुल्काचा अतिरिक्त भार 
"ट्राय'ने लावलेल्या नियमांनुसार 154 रुपयांमध्ये शंभर फ्री टू एअर चॅनल देण्यात येणार आहे. या चॅनलनंतर ग्राहकाने निवडलेल्या 25 चॅनेल्स मागे ट्राय ग्राहकांकडून 20 रुपये कॅपॅसिटी फी म्हणून वसूल करणार असल्याने या कॅपॅसिटी भार देखील ग्राहकांना सोसावा लागणार आहे. 

डीटीएच कंपन्यांकडून ग्राहकांची लूट 
जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आतापर्यंत केबलसाठी महिन्याला 150 रुपये घेतले जात होते; परंतु "ट्राय'च्या नवीन धोरणानुसार ग्रामीण भागातील ग्राहकांवर केबलधारक व डीटीएच कंपन्या पॅकेज लादत असल्याने याठिकाणी ग्राहकांची अधिक होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. तसेच केबलधारकांकडून ग्राहकांना आवडीचे चॅनल निवडण्यासाठी सक्ती करता येणार नाही. मात्र, डीटीएचधारकांचे केवळ पॅकेजच उपलब्ध असल्याने त्यांच्याकडून ग्राहकांची लूट सुरू आहे. 

महानगरांना फायदा, ग्रामीण भागास फटका 
मेट्रा सिटीतील ग्राहकांनी केलेल्या तक्रारींमुळे "ट्राय'ने संपूर्ण देशभरात हा निर्णय लागू केला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल निवडीचा अधिकार मिळाला असून, तितकेच पैसे केबलधारकांना द्यावे लागणार आहे. मेट्रोसिटीतील ग्राहकांचे उत्पन्न आणि ग्रामीण भागातील ग्राहकांचे उत्पन्न यामध्ये प्रचंड तफावत आहे. "ट्राय'च्या निर्णयाचा फायदा हा मेट्रोसिटीतील ग्राहकांना झाला. मात्र त्याचा भुर्दंड ग्रामीण भागातील ग्राहकांना सोसावा लागणार आहे. 

असे आहेत केबल्सच्या पॅकेजचे दर 
केबल सर्व्हिस प्रोव्हायडरनी ग्राहकांसाठी चॅनलचे पॅकेज तयार केले आहे. यामध्ये 153 रुपयांमध्ये 111 चॅनल, 250 रुपयांमध्ये 191 चॅनल, 300 रुपयांमध्ये 198 चॅनल, 320 रुपयांमध्ये 215 चॅनल, 350 रुपयांमध्ये 217 चॅनल, 375 रुपयांमध्ये 223 चॅनल, 400 रुपयांमध्ये 233 चॅनल तर "एचडी'साठी 430 रुपयांमध्ये 227 चॅनल, 450 रुपयांमध्ये 254 चॅनल असे पॅकेज ग्राहकांना दिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT