Crime News
Crime News Sakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : सिनेस्टाइलने आरोपी स्कॉर्पिओमधून फरारी! शहादा न्यायालयात नेताना घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : शहादा पोलिस ठाण्यात २०२२ च्या गुन्ह्यातील आरोपीला येथील न्यायालयात सोमवारी (ता. ८) दुपारच्या सत्रात हजर करण्यासाठी आणले असता पोलिसांना आरोपीने हिसका देऊन पांढऱ्या रंगाचा स्कॉर्पिओ गाडीत बसून सिनेस्टाइल फरारी झाला.

दरम्यान, संबंधित पोलिसांनी पाठलाग केला; परंतु डोंगरगाव रस्त्याच्या दिशेने सुसाट निघालेल्या स्कॉर्पिओने एका व्यक्तीस धडक देऊन फरारी झाली. या वेळी पोलिसांनी नाकाबंदी केली; परंतु आरोपी व संबंधित गाडी अद्यापही मिळून आली नाही. (Cinestyle accused escapes from Scorpio car incident happened while accused taken to court at Shahada Nandurbar Crime News)

शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०७/२२ कलम ३७९ मधील अटकेत असलेला आरोपी ओम प्रकाश ऊर्फ ओमाराम किसनराव जाट (वय २५) हा आरोपी राजस्थानमधील असून, सराईत गुन्हेगार असल्याचे समजते.

राजस्थानमध्येही संबंधितावर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीस शहादा पोलिसांनी पकडून आणले होते. त्याला तीन दिवसांपूर्वी शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी पुन्हा न्यायालयात संबंधित आरोपीला पोलिस ठाण्यातून बेड्या घालून हजर केले होते; परंतु विश्रांतीसाठी आरोपी बसला होता. या वेळी एका अनोळखी व्यक्तीने संबंधित आरोपीजवळ येऊन हितगुज केले.

नंतर नंबरप्लेट नसलेली पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी न्यायालयाच्या आवारात आली. त्याच वेळी आरोपीने संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला हिसका देऊन स्कॉर्पिओ गाडीत प्रवेश केला. संबंधित गाडीच्या चालकाने गाडी डोंगरगाव रस्त्याच्या दिशेने भरधाव नेली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या वेळी शहरातील गोविंदनगर येथील रहिवासी निवृत्त शिक्षक सुरेश कांजी चौधरी ओम ॲक्सिडेंट हॉस्पिटललगत उभे असताना त्यांना स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले.

रस्त्यावरही भरधाव जात असताना अनेकांनी पाहिले. शहादा पोलिसांनी तत्काळ म्हसावद, दरा फाटा तसेच विविध ठिकाणी नाकाबंदी केली; परंतु अद्याप पर्यंत आरोपी मिळून आला नाही.

सिनेस्टाइल घटना

पोलिस कस्टडीमधून पलायन केलेल्या आरोपीने चित्रपटातील एखाद्या दृश्याप्रमाणे पोलिसाला हिसका देऊन न्यायालयाच्या आवारातून पलायन केले. या वेळी सुसाट निघालेल्या गाडीच्या मागे क्षणाचाही विलंब न करता पोलिस कर्मचाऱ्याने धाव घेतली;

परंतु गाडी एवढ्या सुसाट वेगाने सुटली की क्षणात नजरेआड झाली. संबंधित गाडी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ असून, गाडीला पुढे व मागे नंबरप्लेट नसल्याने गाडी कुणाची आहे हे मात्र समजू शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT