Cold
Cold 
उत्तर महाराष्ट्र

थंडी पुन्हा परतली

सकाळवृत्तसेवा

जळगाव - गेल्या दहा- पंधरा दिवसांपासून सर्वत्र थंडीची लाट आली होती. या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पारा ४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. मध्यंतरी दोन- तीन दिवस थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, काल रात्रीपासून अचानक थंडीची लाट परतल्याने जळगावचा पारा ९ अंशांवर आला आहे. दिवसभर गार वाऱ्यांमुळे थंडी अधिक जाणवत होती.

जम्मू- काश्‍मीर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होण्यास सुरवात झाल्याने उत्तर भारतात दोन दिवसांपासून पुन्हा थंडीची लाट परतली आहे. उत्तर भारतातील थंडीचा प्रभाव रात्रीपासून जाणवू लागला आहे. यामुळे मध्यंतरी दोन- तीन दिवस गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे.

पहाटेपासूनच गार वारे वाहत असल्याने थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत आहे. दिवसभर थंडीच जाणवत असल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात आल्या होत्या. दिवसाही गार वारे सुरू आहे. मध्यंतरी दोन- तीन दिवस दुपारी काहीशी उष्णता वाढली होती. तसेच अंशतः ढगाळ वातावरण होते. आज देखील दुपारच्यावेळी ढगाळ वातावरण होते. तरीही थंडीचे प्रमाण वाढल्याचा अनुभव आज आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT