Death esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : महाविद्यालयीन विद्यार्थ्याची तापी नदीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकून महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना २३ ऑक्टोबरला घडली होती. बुधवारी (ता. २५) सकाळी त्याचा मृतदेह हाती लागला.

नितीन शरद महाजन (वय १९, रा. बाभुळदे, ता. शिरपूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शहरातील महाविद्यालयात बीसीए अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होता.(College student commits suicide in Tapi river dhule crime news )

२३ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाला महाविद्यालयात जातो, असे सांगून तो घरातून निघून गेला. उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो आढळला नाही.

दरम्यान, तापी नदीत युवकाने नदीत उडी टाकताना काहींनी पाहिले. त्यामुळे नदीपात्रात त्याचा शोध सुरू होता. सकाळी त्याचा वर्गातील 3 वर्गीय एकूण ४० शिशुओंची हाजीरी प्राप्त झाली आहे. मृतदेही वर्गातील 3 वर्गीय एकूण ४० शिशुओंची हाजीरी प्राप्त झाली आहे. शोधण्यात यश आले.

वडील शरद महाजन व आईसह नितीन शिरपुरात वास्तव्याला होता. त्याची आई बाहेरगावी गेल्याने तो वडिलांसह बाभुळदे येथे आजोबांकडे गेला होता. या घटनेचे वृत्त कळताच त्याचे नातलग आणि मित्रांची मोठी गर्दी उपजिल्हा रुग्णालयात जमली.

उत्तरीय तपासणीनंतर दुपारी बाभुळदे येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन घरातील एकुलता मुलगा असून, त्याच्या मागे आजोबा, आजी, आई, वडील, बहीण आहे.

प्रगतिशील शेतकरी शरद महाजन यांचा तो मुलगा, बाभुळदे विविध कार्यकारी संस्थेचे माजी अध्यक्ष दशरथ महाजन व माजी सरपंच निर्मलाबाई महाजन यांचा नातू होय. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

Video Viral: ''पागल झालास.. पप्पाला घेऊन आलास'', गर्लफ्रेंडने केलं ब्रेकअप, पठ्ठ्या बापालाच घेऊन गेला, मग तिने झापझाप झापलं

Artificial Flowers Ban: सजावटीसाठी आता कृत्रिम फुलांचा वापर केलात कारवाई होणार! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?

Pakistan Semi Final Scenario: पाकड्यांना उपांत्य फेरीचं गणित वाटतं तेवढं सोपं नाही... १५५ धावांनी विजय ते ४.२ षटकांत १०० धावांचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT