Tukaram Munde
Tukaram Munde 
उत्तर महाराष्ट्र

महापालिका वर्तुळात आयुक्त बदलीची चर्चा

सकाळवृत्तसेवा

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार असले, तरी रजेपेक्षा त्यांच्या बदलीचीच चर्चा महापालिका वर्तुळात अधिक आहे. 

शहरात काही महिन्यांपासून आयुक्त मुंढे यांच्याविरोधात रोष आहे. सर्वप्रथम पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांच त्यांच्यावर रोष आहे. करयोग्य मूल्यदरात वाढ करून आयुक्तांनी सर्वसामान्य नागरिकांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यात पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनीवर कर लागू केल्याने शेतकरीवर्ग भडकला आहे.

अनधिकृत लॉन्स, मंगल कार्यालये, पूररेषेतील बांधकामे अनधिकृत ठरवून तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. उद्योगांकडील मोकळे भूखंड, पार्किंग आदींवर कर लावल्याने सर्वसामान्यांमध्ये करवाढीची भीती निर्माण झाली आहे. त्यात सिडकोतील अनधिकृत घरे तोडण्याचा निर्णय घेतल्याने तेथील नागरिक संतप्त झाले आहेत. सिडको बचाव संघर्ष समिती स्थापन करून आयुक्तांविरोधात भूमिका घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करताना चुकीच्या पद्धतीने फेरीवाला धोरण राबविले जात असल्याचा आरोप करत टपरीधारक, फेरीवाले आयुक्तांविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजप नगरसेवकांकडूनही थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत मुंढे यांच्याविरोधात तक्रारी पोचल्या आहेत. त्यातच शुक्रवारी (ता. २५) ग्रीनफिल्ड लॉन्सवरील कारवाईवरून आयुक्त मुंढे यांना शब्दांत फटकारल्याने चहूबाजूने विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंधरा दिवसांची रजा आयुक्तांनी टाकली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Game Of Thrones : 'गेम ऑफ थ्रोन्स' मधील 'या' कलाकाराचं निधन; "त्यांच्याशिवाय जगणं मुश्किल.." पार्टनरची पोस्ट चर्चेत

Sushma Andhare : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अंधारे करणार तक्रार; प्रचार सभेतील भाषणावर घेतला आक्षेप

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

SCROLL FOR NEXT