CET-Exam
CET-Exam 
उत्तर महाराष्ट्र

सीईटीच्या पर्सेंटाईल निकालामुळे गोंधळ

अरुण मलाणी

नाशिक - राज्यस्तरावर घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यंदा प्रथमच पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केलेल्या या निकालात त्रुटी असून, कमी गुण असूनही विद्यार्थ्यांना नव्वदहून अधिक पर्सेंटाईल दिसत असल्याचा दावा आहे. गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळूनही चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाचे स्वप्न भंगणार असल्याने विद्यार्थी न्यायालयात दाद मागण्याच्या तयारी असल्याचे वृत्त आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी सेलमार्फत ऑनलाइन स्वरूपात एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली होती. निकालही प्रथमच पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला. पर्सेंटाईल काढण्याच्या पद्धतीमध्ये त्रुटी असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.

एमएचटी-सीईटीच्या पर्सेंटाईल पद्धतीच्या निकालामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे. ९५ पर्सेंटाईलपेक्षा खालील विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित असलेल्या नामांकित महाविद्यालयात प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. निकालातील तांत्रिक त्रुटीमुळे हा घोळ झाला आहे.
- हरीश बुटले, संस्थापक सचिव, डिपर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT