Congress MLA Nirmala Gavit will join Shiv Sena tomorrow
Congress MLA Nirmala Gavit will join Shiv Sena tomorrow 
उत्तर महाराष्ट्र

काँग्रेसच्या 'हाता'तून आणखी एक आमदार गेला; निर्मला गावित शिवसेनेत 

सकाळ वृत्तसेवा

घोटी : इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरमधून विधानसभेत सलग दोनदा प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी हॅट्‌ट्रिकची तयारी केली असली, तरीही त्या काँग्रेसकडून लढणार नसल्याचे निश्चित आहे. त्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी शिवबंधन बांधून घेतल्यास इगतपुरी- त्र्यंबकेश्‍वरमध्ये काँग्रेसची वाताहत होणार हे नक्की आहे. निर्मला गावित उद्या (मंगळवार) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशाची वेळ तारीख ठरली आहे. उद्या मुंबईत दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश नक्की झाला आहे, अशी अधिकृत माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली आहे.

आमदार गावित भाजपमध्ये प्रवेश करणार अशा ‘वावड्या’ उठल्या होत्या. पण आपण पक्षांतर करणार नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या इच्छुकांच्या प्रवेशप्रक्रियेत सहभाग घेतला. मग जलसंपदा विभागातील अभियंता पती रमेश गावित यांची बदली करून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला होता. मुळातच काँग्रेसमध्ये गावित द्विधा मनस्थितीत राहण्यामागे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर विधानसभा मतदारसंघातून घेतलेली आघाडी कारणीभूत आहे. त्याचबरोबर बंधू भरत गावित यांचे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीचे संकेत पक्षाकडून मिळत नसल्याने तळ्यात-मळ्यात चालले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभा निवडणुकीसाठी विचार करण्याचा शब्द काँग्रेसतर्फे देण्यात आला होता. आता मात्र नवापूर मतदारसंघातून माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या नावाचा काँग्रेसने विचार सुरू केल्याने भरत गावित यांनी हातावर ‘कमळ’ बांधण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

शिवसेनेचे निमंत्रण
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ‘मातोश्री’मध्ये येण्याचा निरोप आमदार गावितांना धाडल्याची चर्चा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गावित यांच्या कार्यकर्त्यांचीही मनधरणी शिवसेनेकडून सुरू आहे. सत्ताधारी पक्षात राहण्यातून मतदारसंघातील विकासकामांना वेग येईल, हा मुद्दा शिवसेनेच्या गोटातून कार्यकर्त्यांच्या मनात रुजविला जात आहे. शिवाय राजकारणापलीकडे वैयक्तिक स्नेहभाव सांभाळणाऱ्या, अशी गावित यांनी ओळख तयार केली आहे. त्यामुळे त्या ‘शिवबंधन’ हातावर कधी बांधणार याकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या नजरा खिळल्या आहेत. दुसरीकडे, गावित यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या शिवसेनेच्या इच्छुकांचा मुखभंग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT