उत्तर महाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझ्या दारासमोर रांग-महाजन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू असून राज्यात इतर पक्षातील नाराज नेत्यांना भाजपमध्ये घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडाकाच लावला आहे. तर, राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांची माझ्या बंगल्यासमोर रांग लागलेली असते, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. जळगाव येथे ब्राम्हण सभेच्या सभागृहात पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत मुलाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सुद्धा लोकसभेला काँग्रेसेने उमेदवारी न दिल्याने पक्ष सोडला. त्यांनतर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु होती. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून २५ हून अधिक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यासाठी संपर्क केला असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केला होता.

एखाद्या पक्षाचा नेता नाराज असल्याची बातमी माध्यमातून आली की, भाजपची एक टीम त्या नेत्याच्या संपर्कात राहते आणि थेट मुख्यमंत्री यांच्या भेटीचं निमंत्रण मिळते. आता तर मात्र भाजपमध्ये प्रवेशासाठी चक्क रांगा लागत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये नेते राहायला तयार नाहीत. भाजपमध्ये येण्यासाठी माझ्या मुंबईच्या बंगल्यावर रोज सकाळपासून लाईन लागलेली असते. शेवटी हात जोडून नंतर पाहू असे सांगावे लागते. अशी परिस्थिती असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT