harish
harish 
उत्तर महाराष्ट्र

विवाहित तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पत्नी, सासू-सासऱ्यांवर गुन्हा

भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील संजयनगरमधील रहिवासी हरीश नानाभाऊ बोरसे (वय 28) या तरुणाने मंगळवारी (ता. 17) दुपारी बाराच्या सुमारास वाजदरे (ता.साक्री) गावशिवारातील त्याच्या शेतात आंब्याच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली होती. त्या पार्श्वभूमीवर मयताचे काका त्र्यंबक पंडित बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु आत्महत्येपूर्वी हरीशने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या अहिराणी भाषेतील व्हिडिओ क्लीपमुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे.

आज (ता. 18) दुपारी दोनच्या सुमारास मयताचे वडील नानाभाऊ गोकुळ बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हरीशच्या पत्नीसह सासरच्या सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पत्नी अश्विनी हरीश बोरसे, सासरा अमृत आसाराम मुजगे, सासू ललिता अमृत मुजगे, साडू बाळू यशवंत पगारे, मेहुणी योगिता बाळू पगारे, मोनी दादा लांडगे व शालक गोपाल अमृत मुजगे (सर्व रा.वासखेडी व जैताणे ता.साक्री) आदी सात संशयितांचा समावेश आहे. हरीशची पत्नी तीन महिन्यांची गरोदर असून सासरचे लोक गर्भलिंग चाचणी करण्यासाठी हरीशवर दबाव टाकत होते. वेळोवेळी फोनवर, प्रत्यक्ष येऊन शिवीगाळ करत होते व धमक्याही देत होते. त्यांच्या जाचाला कंटाळूनच हरिशने आत्महत्या केल्याचे नानाभाऊ बोरसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कौतिक सुरवाडे घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT