Dambraya song poster.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : ‘डांबऱ्या’ने ओलांडला 1 कोटी दर्शकांचा आकडा; व्यसनमुक्तीवर आधारित गीत

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : दिवसेंदिवस समाजात पसरत चाललेली व्यसनाधीनता आणि सोबतच अनेक प्रेमी गाण्यांची मालिका त्यात व्यसनमुक्तीपर गीत म्हटल्यावर लोकांचा प्रतिसाद आणि दाद ही मर्यादित असणार. (Dambarya has crossed 1 crore views After saying song about addiction nandurbar news)

मुळात आपल्या मनात ठासलेली ही भावना आणि भ्रम, याच भ्रमाला तोड देत आदिवासी कवी, गीतकार म्हणून ओळख असलेल्या ॲड. सुभाष वळवी (ऊर्मिला माळकर) यांच्या निर्मितीने समाजात एक वेगळे चित्र उभे केले आहे.

मागील वर्षी सप्टेंबरच्या हिरव्यागार वातावरणात धडगाव तालुक्यातील हुंडा-रोषमाळ येथे गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले असून, स्वतः गावातील ज्येष्ठ बालगोपाळ, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी छोट्या-मोठ्या कलाकारांच्या रूपात सहभाग नोंदविला आहे, हे विशेष! गावात नर्मदा परिसर विकास बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे.

त्या संस्थेच्या माध्यमातून आदर्श गावनिर्मितीसाठी पाऊल टाकत अनेक समाजहिताची कामे, त्यात वृक्षारोपणासह सार्वजनिक कार्यक्रमात दारूबंदीचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात आल्याने दिग्दर्शक ॲड. सुभाष वळवी यांनी गावातील संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाबूलाल पावरा यांची भेट घेऊन ‘डांबऱ्या’ गीताची निर्मिती करण्यासाठी ग्रामस्थांसोबत चर्चा करून निर्णय घेऊन अवघ्या काही दिवसांत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्याने चित्रीकरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले होते.

स्थानिक कलाकारांना संधी

गीताचे लिखाण, चाल, दिग्दर्शन आणि निर्मिती स्वतः ॲड. सुभाष वळवी यांनी केली असून, गीताचे रेकॉर्डिंगही सेंधवा येथील रोहिणी रेकॉर्डिंग स्टुडिओ येथे झाले असून, संगीतबद्ध रितेश किराडे यांनी केले आहे.

गीतगायन हे भगदरी येथील पार्श्वगायक विश्वनाथ पाडवी व धानोऱ्याची पल्लवी वसावे यांनी केले आहे. मुख्य कलाकारांच्या रूपाने डेडियापाडा येथील प्रसिद्ध कलाकार सरू वसावा आणि तरुण वसावा यांनी काम केले आहे. गीताचे चित्रीकरण मध्य प्रदेशहून पुष्पेंद्र भोसले आणि सजावट आकेश ठाकूर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Live Updates : अभिनेता सोनू सूद पंजाबमधील पूरग्रस्त भागांना भेट देण्यासाठी अमृतसर विमानतळावर दाखल

Karul Ghat Road Close : करूळ घाट प्रवासासाठी अतिशय धोकादायक, तज्ज्ञांकडून सर्वेक्षण; दरड हटविण्याचे काम थांबविले

Pitru Paksha 2025: आजपासून पितृपक्ष सुरू, नवपंचम राजयोगाचे दुर्मिळ संयोजन, 'या' 3 राशींसाठी सुरू होईल गोल्डन टाइम

Vijay Mallya : विजय माल्ल्या, नीरव मोदीचे लवकरच प्रत्यार्पण ? ब्रिटीश टीमने केला तिहार जेलचा दौरा

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होणार? अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यात अडचणी

SCROLL FOR NEXT