उत्तर महाराष्ट्र

मक्याचे बियाणे खाल्ल्याने विषबाधा होऊन मोराचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

नगरसूल - सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून मकावर लष्करी आळीचा हल्ला होत आहेत. यामुळे शेतकरी बियाण्यांना कीटकनाशके लावून लागवड करत आहेत मात्र हेच बियाणे खाल्ल्याने नगरसूल येथे एका मोराला आपला प्राण गमवावा लागला आहे.

येथील लहीत रस्त्यालगत बोरसे वस्ती शेजारील साहेबराव रामभाऊ शिंदे यांच्या शेतात झाडा खाली मृत अवस्थेत  मोर कामाला गेलेल्या महिलांना दिसला. मृत अवस्थेत मोराचे सौंदर्य जवळू पाहील्यावर ह्या  महिलाचा कंठ दाटून आला. त्यांनी शेजारीच असलेल्या प्रल्हाद शिंदे यांना बोलावले. त्यांनीही  मोर हलविला पण त्याचा मृत्यु झाल्याचे लक्षात आले. त्यांनी संतोष कुडके,भाऊलाल कुडके यांना झालेल्या घटनाची माहीती दिली. त्यांनी तात्काळ येवला वनविभागासी संपर्क साधून वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांना माहीती दिली असता वनपाल मोहन पवार,सरपंच प्रसाद पाटील,वनरक्षक गोपाळ हारगावकर वनरक्षक, विकास देशमुख आदी काही वेळेत हजर झाले. 

सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतात शेतकरी बियाणे पेरतो हे बियाणे विषारी औषधे लावलेले असल्याने  हे पक्षी खातात मग असा प्रकार होवू शकतो. मोराचा मृत्यु नेमका कशाने झाला हे अहवाल आल्यावर समजेल असे भंडारी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT