yeola
yeola 
उत्तर महाराष्ट्र

पंचनामे करा, वास्तव तपासा पण दुष्काळ जाहीर करा

सकाळवृत्तसेवा

येवला - शेतात पिके उभी करपली, जनावरांना चारा-पाणी नाही, २३ गावे, १९ वाड्यांना तब्बल १५ टँकरद्वारे भर पावसाळ्यात देखील पाणीपुरवठा सुरु आहे..अशी दाहकता असतांना अजून किती गंभीर परिस्थिती असायला पाहिजे..

असा सवाल करून आठ दिवसात पिक कापणी करून शासनाने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यासह प्रचंड मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांनी दिला आहे.

शहरातील पाऊस मोजून ग्रामीण भागातील पावसाला दुर्लक्षित करून तालुक्यात सुकाळ असल्याचे चित्र शासन दाखवत आहे.तालुका दुष्काळी असल्याची पाहणी करण्यासाठी जलसंधारण व राजशिष्टातचार मंत्री राम शिंदे येणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे अद्याप त्यांना वेळ मिळालाच नाही. याशिवाय तालुक्याचा पिक कापणी अहवाल देखील शासनापर्यंत पोहचला नसून दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत तालुक्याचा समावेश नाही. तालुक्याची सातत्याने होणारी दिशाभूल कदापि खपवून घेतली जाणार नाही.असा इशारा त्यांनी दिला आहे.

सोमवारी (ता.२९) येथील तहसील कार्यालयावर शिवसैनिक व शेतकरी बांधवासह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी देखील दिला आहे. येथील दुष्काळ इतका भयानक आहे कि तालुक्यातील गावांना पावसाळ्यात देखील टॅकर द्वारे पाणीपुरवठा सुरु असून आता टंकरची मागणी गावोगावी सुरु झाली आहे. हातची पिके पाण्याअभावी वाया गेली असून जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.विहीरीना नविन पाणी उतरले नाही.पावसाअभावी खरीपाचे बारा वाजले पण रब्बी हंगामाचे पूर्ण नुकसान होणार आहे.शेतकरी व शेतमजूरावर स्थलांतराची वेळ आली आहे. सर्वात कमी पर्जन्यमान झाले असुनही तालुका दुष्काळी तालुक्याच्या यादीत नाही.त्यामुळे शेतकरी व जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्याचा प्राधान्याने विचार न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनचा इशारा संभाजीराजे पवार, तालुका प्रमुख रतन बोरनारे आदींनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT