The controversial cafe on Shri Swaminarayan Mandir Marg in Devpur.
The controversial cafe on Shri Swaminarayan Mandir Marg in Devpur. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : देवपूरमधील कॅफेवर पोलिस छापा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : देवपूरमधील दत्तमंदीर चौक ते श्री स्वामी नारायण मंदिर रोडवरील कुप्रसिध्द वादग्रस्त कॅफेच्या वरच्या मजल्यावर तरूण-तरूणी अश्‍लील चाळे करत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली. त्यानुसार देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पथकाने कॅफेवर छापा टाकला. झडतीत आठ मुले- मुली आढळल्या. हजेरी घेत त्यांच्यासह पालकांना समज देण्यात आली. या प्रकरणी कॅफे चालकाविरुध्द कारवाई होणार आहे. (Dhule crime Police raid a cafe in Devpur)

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुनिल वसावे, तळेकर, इंदवे, मिलिंद सोनवणे, हवालदार पंकज चव्हाण, राहुल गुंजाळ, लता पाटील, मनीषा बांगड, राजेंद्र हिवरकर, मोहिनी माळी यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, देवपूरमधील माहेर हॉस्पिटल परिसरातील एक कॅफे व लॉजवरही दिवसभर शालेय विद्यार्थिनी, विद्यार्थी ये- जा करत असतात. (latest marathi news)

तेथे अश्‍लिल चाळे चालत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. कॅफे व लॉज असल्याने गैरप्रकारांना वाव मिळत असल्याचे तक्रारदारांचे सांगणे आहे.

यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारी झाल्या असून कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे. कॅफेच्या भागात पलंग येतात कसे, लॉजमध्ये रात्री- अपरात्री नेमके काय चालले याची पोलिसांनी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT