Dhule Lok Sabha Constituency  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : चौघांच्या माघारीनंतर रिंगणात 18 उमेदवार

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ६) चौघांच्या माघारीनंतर १८ उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ६) चौघांच्या माघारीनंतर १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ११ अपक्षांचा सहभाग आहे. मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये होणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी ३ मे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. यात ३० उमेदवारांनी ४२ नामनिर्देशनपत्र दाखल केले. उमेदवारांच्या या अर्जांची ४ मेस छाननी पार पडली. ()

या छाननी प्रक्रियेत २२ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध, तर ८ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. माघारीचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने दुपारी तीनपर्यंत चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात १८ उमेदवार उरले आहेत. येत्या २० मेस सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान होणार असून, ४ जूनला सकाळी आठपासून शासकीय धान्य गोडाउन येथे मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. (latest marathi news)

उमेदवार असे : जहूर अहमद मोहम्मद युसूफ (जम जम), बहुजन समाज पार्टी, शोभा दिनेश बच्छाव (इंडियन नॅशनल काँग्रेस), सुभाष रामराव भामरे (भारतीय जनता पक्ष), नामदेव रोहिदास येळवे (भारतीय जवान किसान पार्टी), शिवाजी नाथू पाटील (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), मुकिम मिना नगरी (भीम सेना), शेख मोहम्मद जैद शमीम अहमद (वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया), अब्दुल हफीज अब्दुल हक (अपक्ष)

इरफान मो. इसहाक (नादिर, अपक्ष), भरत बाबूराव जाधव (अपक्ष), मलय प्रकाश पाटील (अपक्ष), मोहम्मद आमिन मोहम्मद फारुख (अपक्ष), मोहम्मद इस्माईल जुम्मन (अपक्ष), राज चव्हाण (अपक्ष), शफीक अहमद मोहम्मद रफीक शेख (अपक्ष), ॲड. सचिन उमाजी निकम (अपक्ष), सुरेश जगन्नाथ ब्राह्मणकर (सुरेश बापू, अपक्ष), संजय रामेश्वर शर्मा (अपक्ष).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल; नवी मुंबईच्या डी वाय पाटीलवर होणार फायनलसह ५ सामने

दिवसाला ९ तास झोपायचा मिळणार १० रुपये पगार... कंपनीची भन्नाट ऑफर, कोण करु शकतो अर्ज?

Metabolic Health: तुम्हीही 'या' चांगल्या सवयींमुळे झटक्यात कमी करू शकता पोटाचा वाढता घेर, मेटाबॉलिक डॉक्टरांनी शेअर केली पोस्ट

DRDO Recruitment 2025: 12वी नंतर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! DRDO मध्ये मेगा भरती सुरु; जाणून घ्या वेतन किती मिळेल

Akola News: धावत्या रेल्वेत महिलेने दिला बाळाला जन्म; रेल्वे स्टेशनवर डॉक्टरच्या अनुपस्थितीने संताप

SCROLL FOR NEXT