From Sri Ekvira Devi Temple on Friday BJP functionaries present after the launch of Dr. Subhash Bhamre campaign. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Lok Sabha Constituency : भाजप-महायुतीचा अधिकृत प्रचार सुरू

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. ३) श्रीफळ वाढविण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. ३) श्रीफळ वाढविण्यात आले. यात खानदेशची कुलदेवता श्री एकवीरादेवी मंदिरातून जयजयकार करीत अधिकृतपणे भाजप-महायुतीने प्रचाराला सुरवात केली. (Official campaign of BJP Mahayuti begins)

उमेदवार डॉ. भामरे यांची विजयातून ‘हॅट्‌ट्रिक’ साधावी यासाठी मंदिरात साकडे घालण्यात आले. भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, डॉ. राहुल सुभाष भामरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष शशिकांत वाघ, शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे, माजी महापौर प्रतिभा चौधरी.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, ओमप्रकाश खंडेलवाल, चेतन मंडोरे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवी बेलपाठक, डॉ. माधुरी बोरसे, माजी उपमहापौर नागसेन बोरसे, नगरसेवक अरुण पवार, आरती पवार.

भगवान गवळी, देवेंद्र सोनार, नरेश चौधरी, राजेश पवार, दगडू बागूल, आकाश परदेशी, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली शिरसाट, उपाध्यक्ष सूरज चौधरी, राजेंद्र खंडेलवाल, कमलाकर पाटील, शेखर कुलकर्णी, सुबोध पाटील, पंकज धात्रक आदी उपस्थित होते. (latest marathi news)

प्रभागात प्रचार

महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ माजी महापौर प्रतिभा चौधरी यांनी प्रभागात घर-घर मोदी अभियानात मतदारांच्या भेटी घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमेदवार डॉ. भामरे यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील जनहितार्थ केलेल्या विकासकामांसह निरनिराळ्या योजनांची माहिती देण्यात आली.

प्रभागात शंभर टक्के मतदानासाठी मतदारांना आवाहन करण्यात आले. माजी महापौर सौ. चौधरी, बूथप्रमुख निशा चौबे, ज्येष्ठ निर्मला मोराणकर, चारुहास मोराणकर, शेखर कुळकर्णी, बूथप्रमुख सुनील कोठावदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सागर चौधरी, दिनेश चौधरी, चंद्रशेखर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT