dhule
dhule 
उत्तर महाराष्ट्र

अक्कलपाडा प्रकल्पातील जलसाठ्यानंतर शेतकऱ्यांची पीके पाण्यात

दगाजी देवरे

धुळे (म्हसदी) : अक्कलपाडा(ता. साक्री) मध्यम प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा साचला आहे. उत्तरा नक्षत्रात पावसाने तारले असले तरी या वाढलेल्या पाण्यामुळे गंगापूर तामसवाडी, इच्छापूर व सय्यदनगर येथील अनेक शेतकर-यांची उभी पीके पाण्याखाली गेली. शिवाय तामसवाडीची पाणी पुरवठ्याची विहीर आणि जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेत पाणी घुसल्याने ग्रामस्थांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून भरपाई अशी मागणी केली जात आहे.

अक्कलपाडा प्रकल्पात  यंदा पावसामुळे पन्नास टक्केपेक्षा अधिक जलसाठा आहे.19 सप्टेंबर अखेर 2.73 टीएमसी पाणी साठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. प्रकल्पाची भक्कमता लक्षात घेत यावर्षी पन्नास टक्के पाणी अडविण्यात आले आहे. दुसरीकडे लघुपाटबंधारे विभागाने 75 ते 80 टक्के पाणी आडविण्याचे ठरविले आहे.तसे झाले तर धरणालगतच्या काही भागाना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याची भीती सबंधीत गांवातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पाण्यात गेलेले बुडित क्षेत्रात दर्शविलेले नाही....?
दरम्यान,तामसवाडी,इच्छापूर,गंगापूर,सय्यदनगर शिवारात कपाशी, डांळिब, आंबा, बाजारी, मका, भुईमूग, कडधान्याची पीके व पाण्याखाली गेलेली पाणी पुरवठ्याच्या विहिरीसह अन्य सिचनांच्या विहरी, शाळा बुडित क्षेत्रात पाटबंधारे विभागाने दर्शविल्या नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधीताना "त्या" अजून लाभ दिला गेलेला नाही.इच्छापूर शिवारातील शेत जमीन अद्यापही संपादित केलेली नाही.सय्यदनगर येथील ग्रामस्थांना शासकीय यंत्रनेने बुडित क्षेत्रातून हलवण्याची नोटीस दिली होती. 

नुकसान भरपाई मिळावी
नुकसानग्रस्त भागाची पाटबंधारे विभागाच्या अधिका-यानी पाहणी केली असली तरी बुडित न दर्शविल्याने नुकसान भरपाई नवीन भूसपदा कायद्यानुसार देण्यात यावी,धरणात साचलेल्या पाण्याचे डोनद्वारे सर्वेक्षण व्हावे अशी मागणी धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष सुभाष काकुस्ते, अक्कलपाड्याचे सरपंच श्रीराम कर्वे,सय्यदनगरचे सरपंच प्रतीनीधी गुलाब चव्हाण,तामसवाडीचे निबा राजाराम अहिरराव,वसमारचे भरत नेरे आदींनी केली आहे.तामसवाडीची पाणी पुरवठ्याच्या विहिर पाण्यात गेल्याने ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा आहे. दुसरीकडे वर्षभरापासून ग्रामस्थ पर्यायी पाण्याची सोय करावी अशी मागणी लावून धरत आहेत. आदिवासींना नव्या गावठाणात भूखंड द्यावेत या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थांनी आज सांगितले.

वाढलेल्या पाण्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी असे :
तामसवाडी  : निंबा अहिरराव, सुपडू पाटील, संजय खैरनार,बारकू खैरनार, शांताराम पाटील, दगडू पाटील, धर्मा पाटील, दौलत पाटील, भाऊसाहेब पाटील,युसुफ पिजांरी,लखा गायकवाड,धवळू भिल,सोनीबाई भिल, नितीन पाटील.
सय्यदनगर : जिजाबाई चव्हाण, धोंडू चव्हाण,मोरसींग चव्हाण, रतीलाल मासुळे,गणसिंग राठोड, मिश्रीलाल राठोड, प्रल्हाद पवार, जबू पवार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT