As there is no bus stand in the area, the passengers have to wait for a bus or other vehicle in the sun.
As there is no bus stand in the area, the passengers have to wait for a bus or other vehicle in the sun. esakal
उत्तर महाराष्ट्र

SAKAL Exclusive : न्याहळोद येथे प्रवाशांची बसस्थानकाअभावी गैरसोय; उन्हामध्ये बसची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

न्याहळोद : परिसरातील न्याहळोद लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठे असूनदेखील येथे चांगले बसस्थानक नसल्याने प्रवासी तसेच विद्यार्थी वर्गाला घाण व दुर्गंधीमध्येच ताटकळत उन्हामध्ये बसची वाट पाहावी लागते. बसची वाट पाहत असताना येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज व धूळ यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. (Dhule Passengers inconvenienced by lack of bus stand at Nyahlod)

न्याहळोद परिसरालगत कौठळ, तामसवाडी, हेंकळवाडी, कापडणे, विश्वनाथ, सुकवड, जापी, शिरडाणे, बिलाडी आदी गावांच्या मध्यभागी असून, येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्याला लागून घर, गटारी व दुकान वसलेली आहेत, यामुळे प्रवाशांना घाण व दुर्गंधीमध्येच बसची वाट पाहावी लागते. पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असूनदेखील प्रवाशांना बसण्यासाठी सुविधा नसल्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना नेमके बसस्थानक कुठे हेच कळत नसल्याने पंचाईत होते.

पिक-अप शेड उभारावे

गेल्या कित्येक वर्षांपासून नव्याने बसस्थानक उभारण्याची मागणी होत असून, प्रवाशांना पावसाळ्यात व उन्हाळ्यात ताटकळत उभे राहावे लागते. वयोवृद्ध व बालके यांना बसची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहनांची नेहमीच वर्दळ होत असल्याने कर्कश आवाज व गाड्यांच्या धुळीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. उन्हाळ्यात व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हाल होत असून, परिवहन विभागाने येथे पिक-अप शेड उभारावे, अशी मागणी जोर धरीत आहे.

घाणीचे साम्राज्य

बसस्थानकालगत प्रचंड प्रमाणावर घाण व दुर्गंधी आहे. बसस्थानकाच्या काही अंतरावर शौचालय असून, त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरते. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. परिसरातून नेहमीच शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी धुळे येथे जातात.

असुविधांमुळे खासगीकडे कल

परिवहन विभागाच्या दिवसातून नऊ ते दहा फेऱ्या होत असून, त्या कौठळ, तामसवाडी, हेंकळवाडी या गावापुरत्या मर्यादित असतात. महामंडळ वेळेवर गाडी सोडत नसल्याने व वाहनाच्या खिडक्या तुटलेल्या, बसमध्ये सीटदेखील तुटलेले असते. (latest marathi news)

न्याहळोदसाठी स्वतंत्र बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाकडे धाव घ्यावी लागते. खासगी वाहनधारक अधिक दर आकारत असून, प्रवाशांना जास्तीचा भुर्दंड सोसावा लागतो. महामंडळाने चांगल्या व वेळेवर बस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांना स्वतंत्र बस हवी

न्याहळोद येथे दहावी ते बारावीपर्यंत शाळा असून, उच्च शिक्षणासाठी धुळे येथील महाविद्यालयात विद्यार्थी ये-जा करतात. यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र बसची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनाकडे धाव घ्यावी लागते.

कौठळ, तामसवाडी येथून गाड्या भरगच्च भरून येत असल्यामुळे येथे बस थांबत नाही. यामुळे काही वेळेस विद्यार्थ्यांना शाळेला मुकावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. आगार विभागाने धुळे ते न्याहळोद स्वतंत्र बसची व्यवस्था करावी, मागणी होत आहे.

"प्रवाशांना पावसाळ्यात व उन्हातान्हातच ताटकळत उभे राहावे लागत असून, वयोवृद्ध व बालके यांना बसण्यासाठी चांगले बसस्थानक व्हावे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागत असल्याने बसस्थानक होणे गरजेचे आहे."-देवीदास जिरे, माजी उपसरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT