Protest of Maratha community during Chakka Jam protest on reservation issue.
Protest of Maratha community during Chakka Jam protest on reservation issue. esakal
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation Case : ओबीसीतून आरक्षणासाठी चक्का-जाम; मराठा समाजाचे मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : सकल मराठा समाजातर्फे मुंबई- आग्रा महामार्गावर चाळीसगाव चौफुली येथे शनिवारी (ता. २४) चक्काजाम आंदोलन झाले. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी हे आंदोलन झाले.

मनोज जरांगे- पाटील यांच्या आवाहनानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलनात जिल्हा मराठा समाजाचे आंदोलक सहभागी झाले.

सरकारने वेळोवेळी मराठा समाजाची फसवणूक केली. मराठा समाजाला व सग्यासोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी मराठा समाजाची मागणी असताना ती सरकारने फेटाळून लावली. अधिवेशनामध्ये दहा टक्के आरक्षणाचे गाजर देऊन न टिकणारे आरक्षण दिले व मराठा समाजाची मोठी फसवणूक केली आहे.

त्यामुळे चक्काजाम आंदोलन केले. परिणामी, दुतर्फा वाहतुकीची कोंडी झाली. आंदोलनात ज्येष्ठ सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे,

राजेंद्र काळे, भोला वाघ, संदीप पाटोळे, माजी आमदार शरद पाटील, अतुल सोनवणे, श्यामकांत सनेर, प्रकाश पाटील, ललित भारुडे, दीपक रौंदळ, प्रभाकर वाघ, किशोर वाघ, वीरेंद्र मोरे, पवन मराठे, विशाल मराठे.

हेमंत भडक, हिमानी वाघ, डॉ. मानसी पाटील, नरेश देवकर, तुषार पाटील, विलास ढवळे, सुनील सरोदे, देवा मोरे, सुनील पाटील, अरविंद भोसले, हेमंत चव्हाण, राजेंद्र जाधव आदी सहभागी झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT