The smoke empire spread in the area due to the smoke coming out from the garbage depot on Varkhedi Road of the Municipal Corporation.
The smoke empire spread in the area due to the smoke coming out from the garbage depot on Varkhedi Road of the Municipal Corporation. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कचरा डेपोतील धुराने कोंडतोय ‘श्‍वास’; परिसरातील नागरिकांना त्रास

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिकेच्या कचरा डेपोवरील धुरामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना रोजच सहन करावा लागत आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने उष्णतेमुळे कचऱ्याच्या ढिगातून निघणाऱ्या गॅसेसमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे या समस्येत भरच पडली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाने कोट्यवधी रुपये महापालिकेला दिले. या खर्चातून नेमके काय काम झाले, असा प्रश्‍न यामुळे उभा राहतो. (Dhule Residents of area are suffering from breathing smoke from garbage depot marathi News)

वरखेडी रोडवर महापालिकेचा कचरा डेपो आहे. या डेपोवरील कचऱ्याला आग लागून त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असतो. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे. कचऱ्याच्या या धुरामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते. सकाळी-सकाळी नागरिक शुद्ध हवा घेण्यासाठी बाहेर पडतात.

वरखेडी रोड कचरा डेपोलगत असलेले वरखेडी गावासह जुने धुळे, डोंगरे महाराजनगर व वरखेडी रोडवरील इतर वसाहतींमधील नागरिकांना मात्र शुद्ध हवा दूरच कचरा डेपोवरील धुराने त्यांचा श्‍वास कोंडला जातो. अगदी घरादारापर्यंत धुराचा हा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. कचऱ्याला लागलेल्या आगीतून निर्माण होणाऱ्या या धुराचा वासही सहन होत नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शिवाय अनेक जणांना आरोग्याच्या समस्यांचाही सामना करावा लागतो.

नवीन वसाहतीत समस्या

वरखेडी रोड भागात अलीकडच्या काळात नवीन वसाहती निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी नागरिकांनी लाखो रुपये खर्चून टुमदार घरे बांधली आहेत. अनेक घरांमध्ये नागरिकांचे वास्तव्य झाले आहे. मात्र, कचरा डेपो व त्यातून निघणाऱ्या धुरामुळे त्यांच्या स्वतःच्या घरात आल्याच्या स्वप्नांवर पाणी फिरत असल्याचे पाहायला मिळते. .(latest marathi news)

प्रदूषणात वाढ

कचरा डेपोतून निघणाऱ्या या धुराचा केवळ परिसरातील नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो असे नाही. तर हा धूर हवेत सर्वदूर पसरतो, त्यामुळे प्रदूषणातही वाढ होते. याचा फटका इतर नागरिकांनाही बसतो. कचऱ्यातून निघणाऱ्या मिथेन व अन्य गॅसेसमुळेच कचऱ्याला आग लागण्याचा प्रकार होतो असे नाही.

अनेक ठिकाणी शहरातील कचराकुंड्यांमध्ये कचरा जाळण्याचा प्रकार होतो व हा कचरा तसाच उचलून तो डेपोवर टाकला जातो, त्यामुळेही कचऱ्याला आग लागण्याचे प्रकार घडतात. डेपोवर मेलेली जनावरेही टाकली जातात. त्यामुळे दुर्गंधीसह धुराचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. सध्या सकाळी तसेच सायंकाळनंतर सर्व परिसरात धूर पसरून दुर्गंधी पसरत असल्याची समस्या आहे.

कचरा व्यवस्थापनाची बोंब

शहरातून दररोज सुमारे २०० टन कचरा‎ संकलित होतो. हा कचरा वरखेडी रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोत टाकला जातो. या डेपोची क्षमता पंधरा वर्षांपूर्वीच संपुष्टात आली आहे. कचऱ्याचे ढीग साचल्याने कचरा थेट रस्त्यापर्यंत टाकला जात होता. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली. यातून साडेतीन एकर जागा मोकळी झाल्याचा दावा महापालिका यंत्रणेकडून होतो. मात्र, रोज निघणारा कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची विल्हेवाट लागत नसल्याने समस्या कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT