Dhule News : निवृत्तिवेतन ‘ई-कुबेर’द्वारे होणार!

Dhule : ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोशागार अधिकारी प्रवीण पंडित यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.
Pension
Pensionesakal

Dhule News : जिल्हा कोशागार कार्यालयातून सर्व निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारकाचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत थेट पेन्शनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा कोशागार अधिकारी प्रवीण पंडित यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली. दरमहा मासिक पेन्शन जमा करण्यासाठी निवृत्तिवेतनधारकांनी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफसी कोडनुसार ही पेन्शन जमा होईल. (Dhule Directly deposited into account of pensioners through Reserve Bank of India through e-Kuber system)

काही पेन्शनधारक कोशागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करून घेतले असेल. अशा पेन्शनधारकांचे पेन्शन जमा होण्यास अडचण निर्माण होईल.

त्यामुळे ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक व बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरू ठेवावे. (latest marathi news)

Pension
Dhule Lok Sabha Election : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ‘दारोदारी’!

भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शनधारकांची राहील, असे जिल्हा कोशागार अधिकारी पंडित यांनी निवेदनात म्हटले आहे.

मार्चचे पेन्शन १० एप्रिलपर्यंत

जिल्ह्यातील सर्व निवृत्तिवेतनधारक, कुटुंब निवृत्तिवेतनधारकांचे माहे मार्च-२०२४ चे मासिक पेन्शन १० एप्रिल २०२४ पर्यंत होईल. याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा कोशागार अधिकारी प्रवीण पंडित यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

Pension
Dhule Lok Sabha Code Of Conduct : आचारसंहितेचे उल्लंघन..! ‘सी-व्हिजिल’वर तक्रार करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com